यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करत परीक्षा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. अखेर शासनाने आज अधिकृत निर्णय घेतला आहे.
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी एप्रिल 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठीची खातेअंतर्गत विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. पूर्वी किमान पाच वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या पोलिस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदासाठी २५% आरक्षणाच्या अंतर्गत विभागीय परीक्षा देता येत होती. या माध्यमातून अनेक मेहनती आणि अनुभवी पोलिस कर्मचाऱ्यांना अधिकारी होण्याची सुवर्णसंधी मिळत होती. मात्र फेब्रुवारी 2022 च्या शासन निर्णयानुसार ही परीक्षा बंद करण्यात आली होती. या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करत योगेश कदम यांनी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून परीक्षा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. अखेर शासनाने बुधवारी शासन निर्णय जारी केला.
advertisement
साधारणपणे पोलिस कॉन्स्टेबलला प्रमोशनद्वारे PSI पद मिळते ते ही त्यांच्या सेवाकालाच्या अखेरच्या टप्प्यात. अशावेळी त्यांना PSI म्हणून फार तर दोन-तीन वर्षेच काम करता येते. परंतु विभागीय परीक्षेतून PSI झालेल्या अधिकाऱ्यांना कमी वयातच पदोन्नती मिळाल्याने त्यांना पुढील २० ते २५ वर्षे PSI तसेच त्यापेक्षा वरिष्ठ पदांवर कार्य करण्याची संधी मिळू शकते. यामुळे पोलिस खात्यात नव्या उमेदीचे, तरुण पोलीस उपनिरीक्षक (PSI) जोशाने आणि ऊर्जेने कार्यरत होतील.
या निर्णयामुळे राज्यातील मेहनती, अनुभवी तसेच तरुण पोलिस अंमलदारांसाठी पोलीस उपनिरीक्षक पदाचा मार्ग पुन्हा खुला झाला आहे. या निर्णयासंबंधी बोलताना गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, पोलिस दलातील मेहनती, कर्तव्यनिष्ठ आणि तरुण पोलिस अंमलदारांना अधिकारी म्हणून पुढे जाण्याची संधी मिळावी यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. या शासन निर्णयामुळे युवा पोलिसांत नवे चैतन्य निर्माण होईल.