दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायची तयारी केल्यानंतर भाजपमधला वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी महाराष्ट्र आणि मुंबईमधल्या भाजप नेत्यांवरच निशाणा साधला आहे. एका माणसाची लाईन छोटी करण्याच्या नादात सगळ्या पक्षाचं नुकसान झालं आहे. आता याची जबाबदारी कोण घेणार? महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांनी ही जबाबदारी घ्यायला हवी, अशी पोस्ट मोहित कंबोज यांनी केली आहे.
advertisement
दरम्यान, यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीही भाष्य केलं आहे. फडणवीसांनी सरकारमध्ये राहून काम करावं अशी विनंती बावनकुळे आणि महाराष्ट्रातल्या इतर भाजप नेत्यांनी फडणवीसांना केली आहे. पराभवाची जबाबदारी आमच्या सर्वांची आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 05, 2024 4:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Devendra Fadnavis : फडणवीस राजीनाम्याच्या तयारीत; भाजपमधला वाद चव्हाट्यावर, नेत्याचा वरिष्ठांवर निशाणा
