आज बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्यावतीने 'निर्धार मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. धनंजय मुंडे यांनी म्हटले की, आज भाषण करणार नव्हतो. इथं बोलावं की मैदानात बोलावं असा प्रश्न होता. पक्षाची बीड जिल्ह्याकडून असलेली अपेक्षा पूर्ण करू असे वचन प्रदेशाध्यक्षांना देऊयात असे मुंडे यांनी म्हटले.
advertisement
वैर माझ्याशी तर...
धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, न बोलण्याची डबल सेंच्युरी झाली आहे. मी 200 दिवस न बोलता काढले आहेत. या दिवसांमध्ये अनेक गोष्टी घडल्या. यामध्ये एक गोष्ट माझ्या जिव्हारी लागली आहे. माझ्या बीड जिल्ह्याची बदनामी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. ज्यांनी बदनामी केली, तो या मातीतला असेल किंवा मातीच्या बाहेर असेल त्यांना एवढंच सांगायचं आहे की, वैर माझ्याशी आहे तर माझ्या मातीची बदनामी कशाला केली, असा सवाल त्यांनी केला.
विरोधकांवर शेरोशायरीने निशाणा...
धनंजय मुंडे यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी शेरोशायरीची पेरणी करत विरोधकांवर हल्लाबोल केला. या जिल्ह्यात मधल्या काळात एक व्यक्ती, एक जिल्हा, एक मतदारसंघ अशा पद्धतीने बदनामी करण्यात आली. तुम्हारी सोच के सांचे में ढल नहीं सकता, जुबान काट लो लहजा बदल नही सकता, अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या? तुम्हारे लोह से ये लोहा पिघल नहीं सकता, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी विरोधकांवर तोफ डागत आपला निर्धार स्पष्ट केला.
Dhananjay Munde: राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात मुंडेंचा विरोधकांवर निशाणा
धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आपल्या प्रकृतीच्या कारणास्तव सार्वजनिक कार्यक्रमात अनुपस्थित असायचे. कालांतराने त्यांनी मोजक्याच कार्यक्रमात हजेरी लावली. विधिमंडळाच्या अधिवेशनात ते उपस्थित राहत होते. यंदाच्या अधिवेशनात त्यांनी बीडमधील खासगी क्लासेसच्या शिक्षकांकडून अल्पवयीन विद्यार्थींनीवर झालेल्या अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला होता.