सावरगावच्या भगवान गडावर आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यात धनजंय मुंडे यांनी भाषण केले. आपल्या भाषणात धनंजय मुंडे यांनी माझ्या लाडक्या भगिनी पंकजा मुंडे असा उल्लेख केला. आजपर्यंत गोपीनाथ मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला सर्वांनी उपस्थिती दाखवत प्रेम दाखवलं त्याबद्दल मी दंडवत घालून नमस्कार करतो. काही दिवसांपूर्वी हा मेळावा होणार नाही, अशी परिस्थिती होती. मात्र, हा दसरा मेळावा घ्यायचा आणि न परंपरा मोडल्याबद्दल पंकजाचे आभार मानत असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले.
advertisement
मी फक्त आमदार, बहीण मंत्री...
धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात पूरग्रस्तांच्या शेतकऱ्यांच्या मदतीवरही भाष्य केले.त्यांनी म्हटले की, आज या ठिकाणी शेतकरी आले आहेत, शेत मजूरही आले आहेत. मी आज मंत्री नाही, फक्त आमदार आहे. पण, माझी बहीण मंत्री आहे आणि ती शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारकडून मोठी मदत आणेल, असा विश्वास मला आहे. गोपीनाथ मुंडे गेल्यानंतरही पंकजाताईने या ऐतिहासिक दसरा मेळाव्याची परंपरा पुढे सुरू ठेवली याबद्दल पंकजाताई आणि प्रीतमचे कौतुक करतो.
मराठा आरक्षणावर भाष्य...
मराठा आरक्षणासाठी आम्हीदेखील प्रयत्न केले. कोणत्याही आरक्षणासाठी मी त्यासोबत उभा राहणारा कार्यकर्ता आहे. काहींना मराठा समाजासाठी ओबीसीमधून आरक्षण घ्यायचा हट्ट आहे. ईडब्लूएस मधील आरक्षणाचा कट ऑफ कमी होता. पण, ओबीसीमधून आरक्षण घेतलेल्या बांधवांची नोकरीची संधी गेली. यातून कोणाचं नुकसान झालं असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला. ओबीसींचे आरक्षण काढून दुसऱ्याला देऊ नका.
मनातली सल काढली...
धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात मनातली सल बोलून दाखवली. माझ्याविरोधात काहींनी आरोप केले. माझ्याविरोधात कोर्टात गेले, कोर्टाने आरोप करणाऱ्यांना दंड ठोठावला. मला कोर्टातून क्लिनचीट मिळाली तरी देखील मला त्याची शिक्षा मिळतेय असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा निकटवर्तीय असल्याने धनंजय मुंडे यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू झाला होता. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कृषी खात्यातील घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांनतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.