धाराशिव : सध्या काही जणांना नोकरी करावीशी वाटते, तर काही जणांना व्यवसाय करावासा वाटतो. काही जण नोकरी मिळत नाही म्हणून व्यवसाय सुरू करतात. तर काही जणांना मनासारखी नोकरी मिळत नाही, म्हणून व्यवसाय सुरू करतात. पण आज आपण अशाच एका व्यक्तीची कहाणी जाणून आहोत, ज्यांनी सिव्हिल इंजीनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले पण त्यांना हवी तशी नोकरी मिळाली नाही म्हणून स्वत:चा व्यवसाय सुरू केला आणि त्यात यशही मिळवून दाखवले.
advertisement
धाराशिव शहरातील तुषार भोसले यांची ही कहाणी आहे. धाराशिव शहरात सिव्हिल इंजिनिअरिंगचा कोर्स केलेल्या या तरुणाने नोकरीसाठी अनेकदा प्रयत्न केले. मात्र, वही तशी नोकरी न मिळल्याने त्यांनी नोकऱ्यांना नाकारलं आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला. धाराशिव शहरातील बार्शी नाका येथे त्यांनी लाकडी तेल घाणा सुरू केला आणि आता ते वर्षाकाठी लाखो रुपये कमवत आहेत.
2018 ला तुषार यांच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना लाकडी तेल खाण्याचे तेल खाण्यास सांगितले होते. त्यामुळे जुना लाकडी तेल घाणा हा आसपास नव्हता. त्यासाठी त्यांनी अधिक चौकशी केली असता लाकडी तेल घाण्याच्या तेलाबाबतची अधिक माहिती मिळवली आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण झाल्यानंतरही तुषार भोसले यांनी नोकरी करण्याची अपेक्षा सोडली.
यानंतर लाकडी तेल घाण्याचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले आणि धाराशिव शहरात लाकडी तेल घाणा सुरू केला. सुरुवातीला तेलाला काही कमी प्रमाणात मागणी होती त्यानंतर हळूहळू मागणी वाढत गेली. आता त्यांच्याकडे सूर्यफूल, जवस, शेंगदाणे, तीळ, करडी, मोहरी, खोबरे अनेक प्रकारचे तेल ते तयार करून देत आहेत. या लाकडी तेल घाण्यावर त्यांच्याकडे पाच मजूर आहेत आणि या सर्वांचा खर्च जाता त्यांना महिन्यासाठी 60 ते 65 हजार रुपयांची कमाई होत आहे, अशी माहिती तुषार भोसले यांनी दिली.