कशी झाली उस्मान टी हाऊसची सुरुवात?
उस्मान इस्माईल नीचलकर यांचे कुटुंब हे मूळ लातूर जिल्ह्यातील रेनापुर येथील. 1980 मध्ये धाराशिवला स्थायिक झाल्यानंतर उस्मान निचलकर यांनी सुरुवातीला वेटर म्हणून काम केले त्यानंतर त्यांनी चहाचा स्टॉल सुरू केला. चहाच्या स्टॉलचे रूपांतर हॉटेल व्यवसायात केले आणि हॉटेलमध्ये गुलाबजाम आणि पेढा विक्रीसाठी ठेवला. त्यांच्या गुलाबजामला मोठ्या प्रमाणात ग्राहकांची पसंती मिळाली. सध्या त्यांच्या हॉटेलमध्ये दररोज 50 ते 60 किलो खव्यापासून बनवलेल्या गुलाबजामची विक्री होते.
advertisement
हिवाळ्यात खावा आरोग्यदायी मेथीचं लोणचं, पाहा सोपी घरगुती रेसिपी
गुलाबजामची 42 वर्षांपासूनची चव आजही कायम आहे. त्यामुळे तर उस्मान टी हाऊसच्या गुलाबजामला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. उस्मान यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा वशिम निचलकर हे आता हॉटेल व्यवसाय सांभाळत आहेत.
जसजशी वाढते गुलाबी थंडी, तसतशी मिळते 'या' मिठाईला पसंती
किती आहे किंमत?
हे गुलाबजाम खवा, मैदा आणि साखरेच्या पाकात बनवले जातात. या गुलाबजामची किंमत 40 रुपये प्लेट आहे. धाराशिवला आलेले अनेक जण गुलाबजाम खाल्ल्याशिवाय परतत नाहीत इतकच नाही तर परदेशातून आलेले अनेक जण आपल्या सोबत गुलाबजामचे पार्सल घेऊन जातात. त्यामुळेच तर धाराशिवचे गुलाबजाम सर्वत्र प्रसिद्ध आहेत, असं उस्मान टी हाऊस मालक वशिम निचलकर यांनी सांगितलं.