धाराशिव: अयोध्येतील राम मंदिरात आज रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्यामुळे 1992 मध्ये राम मंदिरासाठी बाबरी मशीद तोडणाऱ्या कारसेवकांचे स्वप्न साकार होत आहे. धाराशिवमधील भूम तालुक्यातून 50 कारसेवक या काळात अयोध्येला गेले होते. यातील सिद्धेश्वर करडुले हे बाबरी पाडण्यासाठी वापरलेली पोलादी पार घेऊनच घरी आले होते. या पारेची आजही ते पूजा करतात आणि आपले स्वप्न साकार झाल्याचे सांगतात.
advertisement
कारसेवकांच्या आठवणी
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील घाट पिंपरी येथील कारसेवक सिद्धेश्वर करडुले हे कारसेवेसाठी 1992 मध्ये अयोध्येला गेले होते. दरम्यान भूम तालुक्यातील 50 कारसेवक यावेळी अयोध्येला गेले होते. सर्व मंडळी कुर्डूवाडी येथून रेल्वेने अयोध्येला गेले होते. अयोध्येला गेलेल्या सिद्धेश्वर करडुले यांनी अयोध्या प्रवासादरम्यानची दैनंदिन रोजनिशी एका वही वरती लिहिली आहे. 3 डिसेंबरला ते अयोध्येत पोहोचले होते.
31 वर्षे अनवाणी फिरले, आता होतेय संकल्पपूर्ती, कोल्हापूरच्या कारसेवकाची कहाणी, Video
आठवण म्हणून आणली पोलादी पार
करडुले यांनी 3 डिसेंबर पासून प्रत्यक्ष घटनेच्या म्हणजेच 6 डिसेंबर पर्यंतचा प्रवास रोजनिशी मध्ये लिहिलेला आहे. तर 6 डिसेंबर रोजी देण्यात आलेल्या घोषणा, वक्त्यांनी केलेली भाषणे त्यांनी वहीमध्ये लिहिली आहेत. त्यांनी आठवण म्हणून अयोध्येवरून येताना पोलादी पार सोबत आणली आहे. अयोध्येहून गावाकडे परत आल्यानंतर घाटपिंपरी गावात त्यांचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले होते.
आमच्यासाठी आनंदाचा क्षण
22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामांची अयोध्या येथे प्राणप्रतिष्ठापना करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने हा आमच्यासाठी अभिमानाचा आनंदाचा आणि दिवाळीचा क्षण असल्याचे सिद्धेश्वर करडुले यांनी बोलताना सांगितले.