खवा निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात इंधन म्हणून लाकडाची गरज पडते. परंतु हाच खवा सौरऊर्जेवर निर्मिती करण्याचा प्रकल्प उद्योजक विनोद जोगदंड यांनी धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरातील एम आय डीसी मध्ये सुरू केला आहे. या प्रकल्पाची दररोज खवा निर्मिती करण्याची क्षमता चार टनाची आहे तर दररोज एक टन खव्याची निर्मिती या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येते.
advertisement
दुग्ध आणि कुक्कुटपालन व्यवसायातून भावांची लाखोंची कमाई; कसं केलं नियोजन? PHOTOS
वृक्षतोड थांबली, नफा वाढला
एक टन खवा निर्मिती करण्यासाठी चार टन लाकूड इंधन म्हणून वापरले जात होते. हे लाकूड आता वापरले जात नाही. सौर ऊर्जेवरील खवा प्रकल्पामुळे होणारी वृक्षतोड थांबली आहे. तर खव्याची गुणवत्ता देखील चांगली असून खव्याला बाजारात मोठी मागणी आहे. सौर ऊर्जाच्या माध्यमातून हायजेनिक आणि चांगल्या प्रतीचा खवा व पेढा निर्माण होतोय. पॅकिंगच्या माध्यमातून खवा व पेढा लोकांपर्यंत पोहोचतोय. त्यामुळे बाजारात या खवा व पेढ्याला मोठी मागणी असल्याचे निर्मल मिल्क प्रोडक्शन असोसिएशनचे संचालक विनोद जोगदंड यांनी सांगितले.
कामगारांवरली खर्चाची बचत
इंधनावर एक टन खवा निर्मिती करण्यासाठी जोगदंड यांना 20 कामगारांची गरज भासायची आणि दररोज चार टन लाकूड जाळावे लागायचे. तर सौर ऊर्जेवरील या प्रकल्पामुळे केवळ दोन कामगार दररोज एक टन खवा निर्मिती करतात. त्यामुळे इंधनावरील व कामगारावरील होणारा खर्च कमी झाले. तसेच लाकूड जाळल्याने होणारे प्रदुषण आणि वृक्षतोड दोन्ही थांबले आहे, असे जोगदंड सांगतात.
पतीचं निधन पण हार मानली नाही, महिला शेतकरी 15 गुंठे शेतीतून घेतायेत लाखोंचं उत्पन्न, Video
सरकारी योजनांचा फायदा
नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून अनुदान मिळते. सीएमईजीपी, पीएमईजीपी, स्मार्ट, पोखरा या योजनांच्या माध्यमातून खवा उत्पादक व पेढा उत्पादक, दूध उत्पादक, महिला बचत गट, शेतकरी गट तसेच नव उद्योजकांना अनुदान मिळते. जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर शासनाकडून 25 ते 60 टक्क्यांपर्यंत अनुदानाच्या स्वरूपात सहकार्य होते, असेही जोगदंड यांनी सांगितले.