TRENDING:

इथल्या चुलीवर कधीच शिजलं नाही मटण, महाराष्ट्रातील शुद्ध शाकाहारी गाव माहितीये का?

Last Updated:

निसर्गाचं विलोभनीय सौंदर्य लाभलेल्या ज्योतिबाच्या वाडी गावाला एक वेगळाच इतिहास आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
धाराशिव, 12 नोव्हेंबर: महाराष्ट्रात अनेकजण शुद्ध शाकाहारी असल्याचं आपल्याला माहितीच असेल. पण एखादं आख्खं गावच शुद्ध शाकाहारी आहे, असं कुणी सांगितलं तर आपला विश्वास बसणार नाही. पण महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात असं एक गाव आहे. जिथल्या चुलींवर कधीच मटण शिजलं नाही. तसेच गावातील कुणीही मांसाहार करत नाही. याच भूम तालुक्यातील ज्योतिबाची वाडी या गावाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
advertisement

ज्योतिबाची वाडी हे बालाघाट डोंगररांगांच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं खेडेगाव आहे. दोन ते अडीच हजार लोकसंख्येच्या या गावात डोंगर पायथ्याच्या कुशीत श्री ज्योतिबाचं देवस्थान आहे. निसर्गाचे विलोभनीय सौंदर्य लाभलेल्या या ज्योतिबाच्या वाडी गावाला एक वेगळाच इतिहास आहे. या गावात मांसाहार केला जात नाही. शेकडो वर्षांपासून हे गाव शुद्ध शाकाहारी असून गावात कोणत्याही प्राण्याची मांसाहारासाठी हत्या होत नाही, असे गावकरी सांगतात.

advertisement

दिवाळीत का फोडतात फटाके? धर्मशास्त्रात सांगितलंय महत्त्वाचं कारण

ज्योतिबाची वाडी येथील महिलांना मांसाहारी जेवणाची रेसिपीच माहिती नाही. कारण गावात कधीच मांसाहारी जेवण बनवले जात नाही. किंबहुना बाहेर गावच्या मुली लग्न होऊन गावात आल्यास त्याही गावाची परंपरा पाळतात, असंही गावकरी सांगतात.

श्री ज्योतिबाचं देवस्थान असलेल्या या गावात दरवर्षी ज्योतिबाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या यात्रा उत्सवाला धाराशिवसह लातूर, बीड, सोलापूर, अहमदनगर आदी जिल्ह्यांतून मोठी गर्दी होत असते. मात्र, हे गाव अद्यापही विकासापासून वंचित आहे. गावात पुरेशा सोयीसुविधांचा अभाव असल्याची तक्रारही गावकरी करतात.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
इथल्या चुलीवर कधीच शिजलं नाही मटण, महाराष्ट्रातील शुद्ध शाकाहारी गाव माहितीये का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल