धाराशिव: गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने राज्यात पुन्हा हजेरी लावलीय. दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाराशिवमध्येही जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पाण्याच्या प्रतिक्षेत असणाऱ्या पिकांना याचा फायदा होणार आहे. मात्र, पाऊस असाच सुरू राहिल्यास शेतकऱ्यांना नव्या संकटाची भीतीही सतावत आहे.
धाराशिवमधील शेतीला निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसतो. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान होतं. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेती पिके पाण्याच्या प्रतिक्षेत होती. आता दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावलीये. त्यामुळे शेती पिकांना जीवदान मिळालंय. परंतु, पाऊस असाच सुरू राहिल्यास काढणीला आलेल्या मूग आणि उडदाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
advertisement
नवीन मूग बाजारात दाखल; आवक मोठी पण भाव कमी! कारण काय?
दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धाराशिवमध्ये चांगला पाऊस झाला आहे. जून महिन्यापासूनच पावसाने सातत्याने हजेरी लावलीये. त्यामुळे जिल्ह्यातील काही प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. यंदा जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला आहे. तसेच तूर आणि कांदा पिकांचीही लागवडही अधिक आहे. सध्याच्या पावसामुळे या पिकांना मोठा फायदा होणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं.