TRENDING:

मित्रांच्या मदतीने पापड उद्योग सुरू, सुरुवातीला तोटा, पण पुन्हा उभारी, आज 180 महिलांना मिळतोय रोजगार

Last Updated:

धाराशिव जिल्ह्यातील परंडा शहरातील झुल्फिकार काझी यांनी 2021 मध्ये पापड व्यवसायाला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी सुरुवातीला 3 लाख रुपयांची गुंतवणूक केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
उदय साबळे, प्रतिनिधी
advertisement

धाराशिव : व्यवसाय करण्याचे ठरवल्यावर अनेकदा व्यवसायात अडचणी येतात. काही जणांना तोटा होतो. त्यामुळे मनात नकारात्मकता येते. मात्र, त्यातूनही काही जण मार्ग काढतात आणि आपला व्यवसाय यशस्वी करुन दाखवतात. आज अशाच एका व्यक्तीची कहाणी आपण जाणून घेणार आहोत. या व्यक्तीने पापड व्यवसायासाठी मित्रांकडून उसने पैसे घेऊन केली तीन लाख रुपयांची गुंतवणूक केली. आता ते महिन्यासाठी 8 ते 10 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत.

advertisement

धाराशिव जिल्ह्यातील परंडा शहरातील झुल्फिकार काझी यांनी 2021 मध्ये पापड व्यवसायाला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी सुरुवातीला 3 लाख रुपयांची गुंतवणूक केली. हे 3 लाख रुपये जमवण्यासाठी त्यांना मित्रांनी मदत केली आणि पापड उद्योग त्यांनी सुरू केला.

मोटार सायकलला हवाय पसंतीचा क्रमांक, तर ही सुवर्णसंधी सोडू नका, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

advertisement

अगदी सुरुवातीला कच्चा माल खरेदी करण्यापासून ते पापड तयार करून विक्री करण्यापर्यंत त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण या सर्व अडचणींवर त्यांनी मात केली. व्यवसायातील बारकावे समजून घेतले आणि पुन्हा दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, व्यवसायाचा ताळमेळ बसत नव्हता कच्चा माल खरेदी ते विक्रीपर्यंतचा खर्चच जास्त होत असल्याने हा व्यवसाय तोट्यात चालला होताय.

advertisement

Swapnil Kusale : फायनलसाठी गावातली मंडळी स्वप्नीलच्या घरी, निकाल लागताच एकच जल्लोष, VIDEO

त्यामुळे हा व्यवसाय बंद करण्याचा विचार काझी यांच्या मनात आला होता. मात्र, पुन्हा एकदा त्यांनी व्यवसायात उभारी घेण्याचं ठरवलं आणि पुन्हा पापड रेसिपी तयार केली आणि पुन्हा दर्जेदार पापडांची निर्मिती केली आणि आता त्यांच्याकडे 180 महिला पापड बनवण्याचे दररोज काम करतात तर त्या सर्व महिलांना किर्ती पापड उद्योगामुळे रोजगार उपलब्ध होत आहे.

advertisement

एकेकाळी मित्रांकडून उसने पैसे घेऊन सुरू केलेला व्यवसाय डळमळीत झाला होता. मात्र, पुन्हा उभारी घेऊन काझी यांनी तो व्यवसाय स्थिरस्थावर केला आहे. आता त्यांना महिन्याकाठी 8 ते 10 लाख रुपयांची उलाढाल होत आहे. यातून त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळते आहे, अशी माहिती झुल्फिकार काझी यांनी लोकल18 बोलताना दिली.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
मित्रांच्या मदतीने पापड उद्योग सुरू, सुरुवातीला तोटा, पण पुन्हा उभारी, आज 180 महिलांना मिळतोय रोजगार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल