धाराशिव : दोन जिवलग मित्रांची ही कहाणी आहे. चव्हाण आणि दयानंद गायकवाड अशी त्यांची नावे आहेत. कामगार ते मालक या त्यांच्या संघर्षांचा लोकल18 च्या टीमने एक विशेष आढावा घेतला.
हे दोन्ही जण धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील ईट येथील आहेत. हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केलेल्या अशोक चव्हाण आणि दयानंद गायकवाड यांची आज स्वत:ची हॉटेल आहे.
advertisement
दयानंद गायकवाड यांनी 15 वर्ष हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले. तर अशोक चव्हाण यांनी 10 वर्ष हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले. अखेर दोन्ही मित्रांनी स्वतःचा व्यवसाय करण्याचं ठरवलं. आधी 100 रुपयांपासून कामाला सुरुवात केली होती. आता स्वतःचा चहाचा व्यवसाय सुरू केला आहे. तसेच त्यातून त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळते आहे.
MPSC मध्ये फेल बिझनेसमध्ये सक्सेस! 18 महिन्यात फेडलं बापाचं 12 लाखांचं कर्ज; कोणीही करेल हा व्यवसाय
2 वर्षांपूर्वी या दोन मित्रांनी कसेबसे 25 हजार रुपये जमा केले आणि चहाचे हॉटेल सुरू केले. आज दिवसाकाठी याठिकाणी 3 ते 4 हजार रुपयांची उलाढाल होत आहे. तर महिन्याकाठी 1 लाख रुपयांची उलाढाल होत आहे. तर त्यांना दिवसाकाठी चहासाठी 100 लीटर दुधाची गरज भासते आहे.
शेतात शॉक लागून होणाऱ्या अपघातांमध्ये वाढ, शेतकऱ्यांनी नेमकी काय घ्यावी काळजी?
कष्ट करण्याची जिद्द आणि चिकाटी असली की चांगले आर्थिक उत्पन्न मिळवता येते, हे या दोघांनी सिद्ध करुन दाखवले आहे.
हॉटेल सुरू करण्यासाठी एकट्याची आर्थिक ताकद नव्हती म्हणून दोघांनी मिळून हॉटेलचा व्यवसाय सुरू केला आणि आज चांगले आर्थिक उत्पन्नही कमावत आहेत. दोन मित्रांनी एकत्र येऊन सुरू केलेला हा व्यवसायाची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.