TRENDING:

भटक्या कुत्र्यांनी एक वर्षाच्या चिमुकलीचे तोडले लचके, मुलीचा गेला जीव; धुळ्यातील घटना

Last Updated:

मोकाट भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. वेगवेगळ्या शहरातून या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना समोर येत असतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दीपक बोरसे, धुळे : मोकाट भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. वेगवेगळ्या शहरातून या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना समोर येत असतात. आता धुळ्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. धुळे शहरात कुत्र्यांच्या झुंडीने केलेल्या हल्ल्यात एका एक वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झालाय.
भटक्या कुत्र्यांनी एक वर्षाच्या चिमुकलीचे तोडले लचके
भटक्या कुत्र्यांनी एक वर्षाच्या चिमुकलीचे तोडले लचके
advertisement

धुळे शहरातील बोरसे नगर परिसरामधील ही घटना असून खुशी तेजाब रहाशे असे या एक वर्ष मुलीचे नाव आहे. नंदुरबार जिल्ह्यातून बांधकाम मजुरीसाठी आलेले तेजाब रहाशे यांचं कुटुंब धुळ्यात बोरसे नगर मधील एका पत्राच्या झोपडीत राहत होते. खुशीची आई पहाटे प्रांत विधीसाठी बाहेर गेलेली असताना खुशी तिच्या भावासोबत घरात झोपलेली होती. यावेळी अचानक चार ते पाच कुत्र्यांनी बांधकाम सुरू असलेल्या घरात प्रवेश करत खुशीवर हल्ला केला. कुत्र्यांच्या झुंडीने खुशीच्या शरीराचे लचके थोडे तिला वरफडत नेले.

advertisement

समृद्धी महामार्गावर स्कॉर्पिओचा भयानक अपघात, 4 जण जागेवरच ठार, घटनास्थळाचे पहिले PHOTOS

खुशीची आई प्रमिला घरी परतल्यानंतर तिने खुशीला कुत्र्यांपासून सोडवले. यावेळी खुशीच्या आई-वडिलांनी तात्काळ तिला धुळ्यातील शासकीय जिल्हा रुग्णालयात तुमच्यासाठी दाखल केलं. मात्र उपचार सुरू असताना डॉक्टरने तिला मृत घोषित केलं. लहान बालकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची गेल्या आठवड्या भरातील ही दुसरी घटना आहे. धुळे शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून महिन्याला पाचशेहून अधिक कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना घडत आहे.

advertisement

एकीकडे शहरातल्या मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत असताना महापालिका प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसल आहे. कुत्र्यांच्या नसबंदी साठी टेंडर काढला असून आचारसंहिता संपल्यानंतर कारवाई करू असं महापालिका प्रशासनाचे म्हणणं आहे. महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शहरात कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आणखी किती बालकांचा बळी जाण्याचे महापालिका प्रशासन वाट पाहणार असा सवाल नागरिक विचारत आहेत.

advertisement

दरम्यान, एकट्या धुळे शहरातच महिन्याला 700 ते 800 जणांचा कुत्रे चावा घेत आहेत. यात लहान बालकांची संख्या सर्वाधिक असते. शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात एकट्या मे महिन्यात 600 जणांना श्वानदंशाची लस देण्यात आली आहे. यात नव्याने श्वानदंश झालेले 272 रूग्ण होते. तर जिल्हा रुग्णालयातही मे महिन्यात 380 जणांवर श्वानदंशानंतर उपचार करण्यात आले आहेत. धुळे महापालिकेच्या दवाखान्यातही 170 हून अधिक जणांनी रेबीजची लस घेतली.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भटक्या कुत्र्यांनी एक वर्षाच्या चिमुकलीचे तोडले लचके, मुलीचा गेला जीव; धुळ्यातील घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल