छत्रपती संभाजीनगरमधल्या औरंगपुरा भागात, एस.बी. कॉलेजजवळ अशे सुंदर किल्ले मिळतात. इथे किल्ल्यांची किंमत ६०० रुपयांपासून सुरू होते आणि २७०० रुपयांपर्यंत जाते. खास म्हणजे हे किल्ले पीओपीचे असल्यानं पुढच्या वर्षीही वापरता येतात.
"आमच्याकडे किल्ल्यांसोबत डेकोरेशनच्या सगळ्या वस्तू मिळतात. मावळे, मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती अशा सगळ्या गोष्टी इथं एकाच ठिकाणी मिळतात," असं विक्रेते राखी राठोड सांगतात.
advertisement
मावळ्यांच्या छोट्या मूर्तींची किंमत वीस रुपयांपासून सुरू होते. शिवाजी महाराजांच्या छोट्या-मोठ्या मूर्तीही इथं मिळतात. खरेदीवर डिस्काउंटची सोय आहे.
जरी आता किल्ले बनवण्याची परंपरा कमी होत चालली असली, तरी रेडिमेड किल्ल्यांमुळे दिवाळीतला किल्ल्यांचा आनंद कायम राहतोय. फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी ही एक छान पर्याय ठरतोय. दिवाळीच्या दिवसांत किल्ल्यांना खूप मागणी असते. त्यामुळं लवकरात लवकर किल्ला खरेदी करणं फायद्याचं ठरतं. एस.बी. कॉलेजजवळच्या दुकानात सकाळी १० ते रात्री १० पर्यंत किल्ले मिळतात. परंपरेचं जतन करत नव्या काळाशी जुळवून घेण्याचा हा एक छानसा प्रयत्न म्हणता येईल. दिवाळीच्या सणाला किल्ल्यांची साथ कायम राहावी, हीच तर खरी महाराष्ट्राची ओळख!