TRENDING:

Satara: दारूड्या रिक्षावाल्याने अनेकांना उडवलं, महिला पोलीस कर्मचाऱ्यालाही फरफटत नेलं, साताऱ्यातील घटनेचा VIDEO

Last Updated:

दारूच्या नशेत बेभान झालेल्या एका रिक्षाचालकाने अनेक वाहनांना धडक दिली. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सचिन जाधव, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

सातारा:  साताऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  दारुच्या नशेत तर्राट असलेल्या एका रिक्षाचालकाने बेभानपणे रिक्षा चालवून एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला धडक दिली. धडक दिल्यानंतरं या महिला कर्मचाऱ्याला २०० मिटरपर्यंत फरफटत नेलं. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  साताऱ्यातील  मोळाचा ओढा परिसरात ही घटना घडली. साताऱ्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणजेच खंडोबाचा माळ येथून मनाली कॉर्नर परिसरात हा प्रकार घडला.  दारूच्या नशेत बेभान झालेल्या एका रिक्षाचालकाने अनेक वाहनांना धडक दिली. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.  घटनेची माहिती वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर भाग्यश्री जाधव या महिला पोलीस कॉन्स्टेबल यांनी रिक्षाचा पाठलाग करत या रिक्षाचालकाला अडवण्याचा प्रयत्न केला.

advertisement

मात्र रिक्षा चालकाने कॉलर पकडत हिसका देऊन त्यांना खाली पाडलं.  भाग्यश्री जाधव खाली पडल्या पण  त्यांचा रेनकोट रिक्षाचा मागील अँगलमध्ये अडकला होता. पण दारूच्या नशेत तर्राट झालेल्या रिक्षाचालकाने तशीच रिक्षा पळवली. रिक्षासोबत संबंधित महिला पोलीस कॉन्स्टेबल 200 मिटरहून अधिक फरफटत गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना खंडोबाचा माळ येथून मनाली कॉर्नरपर्यंत घडली. हा सगळा प्रकार  दुकानांमधील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

advertisement

या घटनेत महिला पोलीस जाधव यांना हाताला आणि डोक्याला दुखापत झाली असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या बेभान रिक्षा चालकाला संतप्त नागरिकांनी पकडून चोप दिला आहे. घटनेची माहिती मिळताच सातारा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी चालकाला ताब्यात घेतलं. सध्या आरोपीवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Satara: दारूड्या रिक्षावाल्याने अनेकांना उडवलं, महिला पोलीस कर्मचाऱ्यालाही फरफटत नेलं, साताऱ्यातील घटनेचा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल