शरद ऋतूच्या सुरुवातीला नवरात्र, एकादशी आणि इतर उपवासांच्या पार्श्वभूमीवर या खिरीला विशेष महत्व आहे. वयोवृद्धांपासून लहानग्यांपर्यंत सगळ्यांचं मन तृप्त करणारा हा सोपा गोड पदार्थ शरीराला उर्जा देखील देतो. साबुदाना खीर कशी करायची, याची सोपी रेसिपी या ठिकाणी देण्यात आली आहे.
Eggplant side effects : 'या' लोकांनी चुकूनही खाऊ नये वांगी; फायदे सोडाच, आरोग्यासाठी ठरू शकते घातक!
advertisement
साबुदाणा खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य:
साबुदाणा (भिजवलेला ) - 1 कप
दूध - 1 ग्लास
साखर - अर्धी वाटी (आवडीनुसार कमी-जास्त करू शकता)
वेलची पूड - 1/2 चमचा
केशर (ऐच्छिक)
बदाम, काजू, पिस्ता - 2 टेबलस्पून (बारीक चिरलेले)
तूप - 1 टेबलस्पून
साबुदाणा खीर बनवण्या कृती: सर्वात अगोदर साबुदाणा स्वच्छ धुवून घ्या आणि अर्ध्या तास पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर एका जाड बुडाच्या भांड्यात दूध उकळून ठेवा. एका पातेल्यात तूप टाक त्यात सगळे ड्रायफ्रुट्स लालसर होईपर्यंत परतून घ्या. ते लालसर झाल्यानंतर बाहेर काढा. त्याच पातेल्यात वेलची पुड टाकून पाणी टाका आणि 2 मिनिट उकळून घ्या. उकळेल्या पाण्यात भिजवलेला साबुदाणा टाका. साबुदाना थोडा शिजल्यानंतर त्यात साखर घाला. साखर पूर्ण विरघळेपर्यंत मिश्रण नीट ढवळत राहा. नंतर त्यात दूध ओता आणि ड्रायफ्रुट्स टाका. खिरीला पुन्हा एक उकळी काढून घ्या. जर तुमच्याकडे केशर असेल तर ते वरून टाका. साबुदाणा खीर गरम किंवा थंड दोन्ही प्रकारे सर्व्ह करता येते. सणासुदीच्या आणि उपवासाच्या काळात खास गोड पदार्थ म्हणून ही रेसिपी फार लोकप्रिय आहे.





