advertisement

धाराशिवमधल्या शिवसेनेत गोंधळात गोंधळ, चुकीच्या पद्धतीनं तिकीट वाटपाचा आरोप

Last Updated:

धाराशिवमधल्या शिवसेनेतल्या गोंधळानं नेत्यांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय.

News18
News18
धाराशिव :  नगर पंचायत आणि महापालिका निवडणुकीत कुणी तिकीट देता का तिकीट हे नाट्य बरंच गाजलं. कार्यकर्त्यांचा फुटलेला हंबरा, हुंदके, आक्रोश आणि अश्रू सगळं आपण पाहिलं. त्याचा पुढचा अंक जिल्हा परिषद पंचायत समितीत सुरु आहे. धाराशिवमधल्या शिवसेनेतल्या गोंधळानं नेत्यांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय.
धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरं जात असलेल्या शिवसेनेत सारं काही आलबेल नसल्याचं चित्र समोर आलं आहे. एकीकडे धाराशिवचे शिवसेनेचे संपर्कमंत्री राजन साळवींना शिवसैनिकांनी घातलेला घेराव,शिवसैनिकांशी त्यांची झालेली वादावादी तर दुसरीकडे धाराशिव दौऱ्यावर असलेल्या प्रताप सरनाईक यांच्यासमोर शिवसैनिकांकडून घोषणाबाजी आणि गोंधळाची घटना घडल्या आहेत.

धाराशिवचं राजकीय वातावरण तापलं

जिल्हा परिषदेत शिवसेनेत झालेले तिकीटवाटप...शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपच्या आमदाराच्या मुलाकडून एबी फॉर्म वाटप केलं जात असल्याचा आरोप करणारी ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. युवा सेनेच्या पदाधिकारी अविनाश खापे याने या ऑडिओ क्लिपमध्ये केलेल्या आरोपामुळं धाराशिवचं राजकीय वातावरण तापलं.
advertisement

जिल्हा परिषदेत तिकीट वाटपात घोळ

दरम्यान जिल्हा परिषदेत तिकीट वाटपात घोळ झाल्याची कबुली प्रताप सरनाईक आणि राजन साळवींनी दिली आहे.  या चुकीच्या तिकीट वाटपाचं खापर या दोन्ही नेत्यांनी शिवसेनेचे नेते अजित पिंगळे यांच्यावर फोडलं आहे. दरम्यान, अजित पिंगळे यांच्या समर्थकांनी पुढे येत या प्रकरणात भूमिका मांडली आहे.

आगामी निवडणुकीत पक्षाला याचा फटका बसण्याची शक्यता

advertisement
धाराशिव जिल्हा परिषदेत शिवसेना आणि भाजपची युती झाली आहे. मात्र या युतीला जागावाटपावरून वाद निर्माण झाला आहे, आता या गोंधळावर जागेच्या अदलाबदलीचा उपाय प्रताप सरनाईकांनी सुचवलाय. धाराशिवमध्ये शिवसेनेतल्या या तिकीट वाटपावरून झालेल्या गोंधळाची गाजत आहे. तिकीट वाटपात घोळाच्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत पक्षाला याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धाराशिवमधल्या शिवसेनेत गोंधळात गोंधळ, चुकीच्या पद्धतीनं तिकीट वाटपाचा आरोप
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement