Bhiwandi: मावस बहिणी आणि भाऊजी भांडत होते, सोडावायला गेला अन् जीवाशी गेला, भिवंडीतील घटना
- Published by:Sachin S
Last Updated:
त्याला तातडीने उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केलं होतं. पण,डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं.
नरेश पाटील, प्रतिनिधी
भिवंडी : मुंबई जवळील भिवंडीमधून आणखी एका तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. दोन जणांच्या भांडणामध्ये मध्यस्थी का केली, याचा राग धरून एका २३ वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला. या प्रकरणी ३ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडीतील शांतीनगर येथील न्यू आझादनगरमध्ये ही घटना घडली. दिशाद शहा (वय 23) असं खून झालेल्या तरुणाचं नाव आाहे. दिशाद शहा याच्यावर ३ जणांनी चाकू हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केलं होतं. पण,डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं.
advertisement
शांतीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितलं की, मयत दिशाद शहा आणि आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे नातेवाईक होते. २५ जाानेवारी २०२६ रोजी दिशाद शहा याने त्याची मावस बहिण शबाना आणि तिच्या पतीमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. आपल्या मावस बहिणीशी भांडण करत असल्यामुळे शहा याने मध्यस्थी केली. शहा याने मध्यस्थी केल्यामुळे आरोपी आसीफ अब्दुलहकीम शहा, अलीहसन अब्दुलहकीम शहा आणि मुझफ्फर अब्दुलहकीम शहा कमालीचे संतापले होते.
advertisement
त्यांनी प्लॅन करून शहा यांच्या हत्येचा कट रचला. दिशाद शहा आणि त्याच्या भावाला गाठलं आणि चाकूने हल्ला केला. आसीफ याने लोखंडी सुऱ्यााने दिलशाद याच्या कमरेच्या खाली डाव्या पायाच्या मांडीवर जोरदार वार करून गंभीर दुखापत केली आणि जीव घेतला. तसंच अलीहसन अब्दुलहकीम शहा याने हातातील चाकूने वार केला. तसंच फिर्यादी गुलजार अहमद शहा यालाही मारहाण केली.
advertisement
या प्रकरणी गुलजार शहा यांनी शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या आधारे तिन्ही आरोपींना अटक केली असून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Location :
Bhiwandi Nizampur,Thane,Maharashtra
First Published :
Jan 26, 2026 7:57 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Bhiwandi: मावस बहिणी आणि भाऊजी भांडत होते, सोडावायला गेला अन् जीवाशी गेला, भिवंडीतील घटना










