TRENDING:

इकडे ठाकरे बंधूंची भेट, तिकडे एकनाथ शिंदेंकडून मुंबई पालिकेसाठी २१ नेत्यांची समिती जाहीर

Last Updated:

Eknath Shinde: आगामी महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या पातळीवरील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी २१ नेत्यांची विशेष समिती जाहीर केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने पक्षाची मुख्य कार्यकारी समिती तयार करण्यात आलेली आहे. यात पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासह २१ शिलेदारांचा समावेश करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे
advertisement

आगामी महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या पातळीवरील महत्त्वाचे निर्णय या समितीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत. शिवसेनेचे प्रमुख नेते, खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार यांना मुख्य कार्यकारी समितीत संधी देण्यात आली आहे.

शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती :

१) एकनाथ शिंदे, मुख्य नेते

२) रामदास कदम, नेते

३) गजानन कीर्तीकर, नेते

४) आनंदराव अडसूळ, नेते

advertisement

५) मीनाताई कांबळे, नेत्या

६) डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार

७) रवींद्र वायकर, खासदार

८) मिलिंद देवरा, राज्यसभा - खासदार

९) राहुल शेवाळे, माजी खासदार

१०) संजय निरुपम, माजी खासदार

११) प्रकाश सुर्वे, आमदार

१२) अशोक पाटील, आमदार

१३) मुरजी पटेल, आमदार

१४) दिलीप लांडे, आमदार

१५) तुकाराम काते, आमदार

१६) मंगेश कुडाळकर, आमदार

advertisement

१७) श्रीमती मनिषा कायंदे, विधान परिषद, आमदार

१८) सदा सरवणकर, माजी आमदार

१९) यामिनी जाधव, माजी आमदार

२०) दीपक सावंत, माजी आमदार

२१) शिशिर शिंदे, माजी आमदार

ठाकरे बंधूंमध्ये युतीच्या चर्चा

ठाकरे बंधूंची जवळीक वाढलेली असताना आणि महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांच्या युतीची चर्चा जोर धरत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन तब्बल अडीच तास चर्चा केली. महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने थेट उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. विविध महापालिका निवडणुकांच्या जागावाटप आणि इतरही वाटाघाटीसंदर्भात आजच्या भेटीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
इकडे ठाकरे बंधूंची भेट, तिकडे एकनाथ शिंदेंकडून मुंबई पालिकेसाठी २१ नेत्यांची समिती जाहीर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल