विलास भुमरे यांनी विधानसभा निवडणुकीला स्थलांतरित मतदारांना मतदारसंघात आणल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यांनीच यावर व्यवस्थित स्पष्टीकरण दिले आहे, त्यांनी शेतकऱ्यांना मदत केल्याचा बातम्या माध्यमांनी सकारात्मकपणे दाखवाव्यात, असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी दिला. भुमरे यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना शिंदे यांना सारवासारव करावी लागली.
विलास भुमरेंच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांचा पत्रकारांनाच सल्ला
शेतकरी आत्महत्या झाल्या त्यालेळी विलास भुमरे यांनी एक लाखाची मदत दिली. माध्यमांनी त्या बातमी लावाव्यात, असा सल्ला देताना २० हजार मतदारांचा खुलासा भुमरे यांनी लगोलग केला. त्यांच्या मतदार संघाच्या बाहेर जी नावे गेलेली आहे ती त्यांनी आणली, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. माध्यमांनी चांगल्या बातम्या दाखवाव्यात, माध्यमे चांगल्या बातम्या दाखवत नाहीत. उद्धव ठाकरे सेनेचे लोक आले होते, कोणतीही मदत त्यांनी केली नाही. तिथे आमचे विलास भुमरे गेले, त्यांनी कुटुंबाला मदत केली. बांधिलकी जपणाऱ्या माणसासोबत तरी असे करू नका, असा सल्ला शिंदे यांनी माध्यमांना दिला.
advertisement
विलास भुमरे काय म्हणाले होते?
पैठणचे आमदार विलास बापू भुमरे यांनी भाषणात बोलताना विधानसभा निवडणुकीत २० हजार मतदान बाहेरून आणले असे सांगितले. मात्र मंचावर बसलेल्या एकनाथ शिंदे यांनी इशारा करताच लागलीच सुधारणा करत मतदान बाहेरून आणले म्हणजेच स्थलांतरित मतदार होते, त्यांना मतदान करण्यासाठी विधानसभेच्या वेळेस आणले असा खुलासा त्यांनी लगोलग केला. विलास भुमरे यांच्या टायमिंगने सभागृहात एकच हशा पिकला.