TRENDING:

Eknath Shinde : बालेकिल्ल्यात शिंदे गटाने दम दाखवला, भाजपसह ठाकरे गटाला केलं चितपट, ठाण्यात काय घडलं?

Last Updated:

Thane Election : शिंदे गटाने बालेकिल्ल्यातच आपलं नाणं खणखणीत वाजणार असल्याचा इशारा मित्रपक्षासह विरोधकांना दिला आहे. शिंदे गटाने भाजपसह शिवसेना ठाकरे गट, मनसेला चितपट केले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला घेरण्याची तयारी भाजपसह शिवसेना ठाकरे गट, मनसेकडून सुरू आहे. मात्र, शिंदे गटाने बालेकिल्ल्यातच आपलं नाणं खणखणीत वाजणार असल्याचा इशारा मित्रपक्षासह विरोधकांना दिला आहे. शिंदे गटाने भाजपसह शिवसेना ठाकरे गट, मनसेला चितपट केले आहे. ठाणे महापालिका निवडणुकीआधीच ठाण्यात महत्त्वाची घडामोड झाली आहे.
बालेकिल्ल्यात शिंदे गटाने दम दाखवला, भाजपसह ठाकरे गटाला केलं चितपट, ठाण्यात काय घडलं?
बालेकिल्ल्यात शिंदे गटाने दम दाखवला, भाजपसह ठाकरे गटाला केलं चितपट, ठाण्यात काय घडलं?
advertisement

ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लक्ष वेधून घेणाऱ्या स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत शिंदे गटाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. माजी नगरसेवक विकास रेपाळे यांच्या नेतृत्वाखालील "स्पोर्टिंग क्लब पॅनल"ने नऊपैकी पाच जागांवर विजय मिळवत बहुमत पटकावले. तर, भाजपचे माजी नगरसेवक डॉ. राजेश मढवी यांच्या "स्पोर्टिंग कार्यशील पॅनल"ला चार जागांवर समाधान मानावे लागले.

advertisement

ही निवडणूक 19 सप्टेंबर रोजी क्लबच्या सेंट्रल मैदानावरील सभागृहात पार पडली. 157 सदस्यांनी मतदान करून 18 उमेदवारांपैकी 9 कार्यकारिणी सदस्यांची निवड केली. विसर्जित कार्यकारिणीतील आठ सदस्य पुन्हा रिंगणात उतरले होते, त्यामुळे लढतीला विशेष रंग चढला.

विशेष म्हणजे, या निवडणुकीत भाजप-शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसे यांची आघाडी पाहायला मिळाली. डॉ. राजेश मढवी (भाजप), सचिन गोरिवले (उबाठा) आणि संदीप पाचंगे (मनसे) यांनी मिळून "स्पोर्टिंग कार्यशील पॅनल" उभं केले होता. दुसरीकडे, शिंदे गटाचे विकास रेपाळे आणि माजी परिवहन सभापती विलास जोशी यांनी "स्पोर्टिंग क्लब पॅनल"मधून मैदानात उडी घेतली. यापूर्वी भाजपचे पदाधिकारी प्रशांत गावंड हे रेपाळे यांच्या पॅनलमधून निवडणूक लढले होते. यंदाही ते त्याच पॅनलमध्ये होते, मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी माघार घेतली. परिणामी, ही निवडणूक शिंदे गट व विरुद्ध भाजप-उबाठा-मनसे अशा थेट लढतीत बदलली.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde : बालेकिल्ल्यात शिंदे गटाने दम दाखवला, भाजपसह ठाकरे गटाला केलं चितपट, ठाण्यात काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल