TRENDING:

Eknath Shinde : महायुतीत नव्या भिडूची एन्ट्री! महापालिका निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला

Last Updated:

Eknath Shinde : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज एक महत्त्वाची घोषणा होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज एक महत्त्वाची घोषणा होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी महापालिका निवडणुकीसाठी समीकरणे जुळवण्यावर भर दिला आहे. एका बाजूला पक्षात इतर पक्षातील नाराजांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न सुरू असून शिवसेना शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू आहे. आता मतांची जुळवाजुळव सुरू केली आहे. आज मोठी घोषणा होणार आहे.
महायुतीत नव्या भिडूची एन्ट्री! महापालिका निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला
महायुतीत नव्या भिडूची एन्ट्री! महापालिका निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला
advertisement

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. राज्यातील सगळेच पक्ष महापालिका निवडणुकीसाठी आपल्या ताकदीची चाचपणी करत आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबई आणि इतर भागात मनसेसोबत युती करण्याचे प्रयत्न सुरू आहे. पडद्यामागे चर्चा सुरू असल्याचे म्हटले जाते. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडून मतांच्या बेगमीसाठी इतर लहान पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. आता एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत आणखी एका पक्षाला सोबत घेतले आहे.

advertisement

महायुतीत नवा भिडू...

राज्यातील महायुतीमध्ये आता आणखी एका नव्या पक्षाची एन्ट्री होणार आहे. एकनाथ शिंदेय यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेनेत युती होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी या युतीची औपचारिक घोषणा करण्यात येणार असून, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नव्या समीकरणांची सुरुवात होणार आहे.

advertisement

ही युती "शिवशक्ती-भीमशक्ती" या ऐतिहासिक संकल्पनेला नव्या रूपात पुढे नेणारी ठरणार आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात नामदेव ढसाळ आणि अर्जुन डांगळे यांच्या सोबत ही संकल्पना प्रथम राबवण्यात आली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याचा प्रयत्न केला, मात्र ती युती यशस्वी ठरली नव्हती.

advertisement

आता एकनाथ शिंदे यांनी खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्यासोबत राजकीय सहकार्याचा नवीन अध्याय सुरू करत "शिवशक्ती-भीमशक्ती"च्या प्रयोगाला नवसंजीवनी दिली आहे. ही युती निवडणुकांपूर्वी दलित-मराठा मतदारांमध्ये ठसा उमटवू शकते, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

युतीच्या फायदा-तोट्याचं गणित काय?

या युतीमुळे मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूरसारख्या शहरी भागांमध्ये शिंदे गटाला फायदा होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे राज्याच्या राजकारणात आपला ठसा उमटवण्याच्या प्रयत्नात असलेल्या आनंदराज आंबेडकर यांना देखील ताकद मिळणार आहे.  दलित आणि ओबीसी वर्गातील मतदारांमध्ये नव्या राजकीय आघाडीचा प्रभाव पडेल का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

advertisement

युतीच्या औपचारिक घोषणेनंतर, दोन्ही पक्ष एकत्रित प्रचार रणनीती, उमेदवार निवड आणि जागावाटपाचा प्रारंभ करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आनंदराज आंबेडकर यांना शिंदे गटाच्या कोट्यातली जागा मिळणार की महायुतीत स्वतंत्रपणे जागा मिळणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde : महायुतीत नव्या भिडूची एन्ट्री! महापालिका निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल