शिवसेना आमदार अमोल खताळ आणि बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये जोरदार संघर्ष सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी रविवारी संगमनेरचा दौरा केला. या दौऱ्यातून आपण आमदार खताळ यांच्या पाठीमागे ठाम उभे असल्याचा संदेश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. जायंट किलरला सुपर जायंट किलर करायचंय ना... अमोल खताळच्या पाठीशी एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे, सगळं मंत्रिमंडळ अमोलच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे ते म्हणाले.
advertisement
आम्ही संजय गांधी योजनेचे पद अमोलला दिले. त्याने संधीचे सोने केले. त्यांने निराधारांना आधार दिला. संधीचे सोने करणारा आमदार कोण तर अमोल खताळ, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी त्यांचे
कौतुक केले.
संगमनेरमध्ये साखर कारखाना, दूध संघ, संस्था सगळ्या त्यांच्याच होत्या. दूध पण माझे, चहा पण माझा, बिस्कीट देखील माझे, मग जनतेचं काय? म्हणून तुम्ही एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडून दिले. अमोलने एकच मारली पण सॉल्लिड मारली. दिल्लीत त्याची चर्चा आहे. 440 चा झटका विरोधकांना दिला तरी ते त्यातून बाहेर येत नाही. अजूनही वाट चोरी झाली म्हणतात. मात्र गेल्या 50-60 वर्षात यांनी काय काय चोरलं, कितीतरी भ्रष्टाचार केला. 2014 पूर्वी तर भ्रष्टाचाराची रांगच होती. त्यांचा मेंदू आणि स्वाभिमान आणि अभिमान देखील चोरीला गेला आहे, असे शिंदे म्हणाले.
लाडक्या बहिणी योजनेत निवडणुकीच्या वेळी काही लोक कोर्टात गेले. काही लोकांनी ही योजना फसवी आहे असे सांगितले, पण लाडक्या बहिणीने लाडक्या भावाचं ऐकलं. माझ्या लाडक्या बहिणीने दोन पाच नंबर नव्हे तर 232 नंबरचा जोडा विरोधकांना हाणला. एवढं मोठं यश महायुतीला कधीच मिळालं नव्हता. हा पराक्रम तुम्ही सर्वांनी केला. लाडके बहीण योजना कधीही बंद होणार नाही. हप्ते मागेपुढे झाले असतील पण बंद होणार नाही. जे जे आश्वासन आम्ही दिले ती टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार. आमचं सरकार प्रिंटिंग मिस्टेककरीत नाही. एक बार मैने कमिटमेंट कर ली, तो मै खुद की भी नही सुनता, असे शिंदे म्हणाले.