TRENDING:

स्वबळावरून धुसफूस, आपण थेट ॲटम बॉम्ब लावू, एकनाथ शिंदे यांचं नाईकांसह भाजपला आव्हान

Last Updated:

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असले, तरी ठाण्यावरची त्यांची नजर हटलेली नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे : ठाणे महापालिकेत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत स्वबळावरून धुसफूस सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यातच घेरण्याचा प्रयत्न भाजपसह विरोधकांकडून केला जातोय. अशात शिंदे यांनी विरोधकांसह भाजपलाही थेट इशारा दिलाय. काहींनी लवंगी फोडण्याचा प्रयत्न केला. पण आपण आता थेट अॅटम बॉम्ब लावू, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी आपले इरादे स्पष्ट केले.
गणेश नाईक-एकनाथ शिंदे
गणेश नाईक-एकनाथ शिंदे
advertisement

लवंगी फोडून गेले त्यांचा समाचार मी घेणार आहे, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता गणेश नाईक यांना टोला लगावला. ठाण्यात एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हा इशारा दिलाय. आपला एकच अॅटमबॉम्बने सुपडा साफ करू, असे शिंदे म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असले, तरी ठाण्यावरची त्यांची नजर हटलेली नाही. ठाण्यामध्ये भाजपने स्वबळावर 75 पारचा नारा दिलाय. तर शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनीही अबकी बार 75 पारचा दावा केला. ठाण्यात ठाकरे बंधू एकत्र येणार असून इतरांच्या ठिकऱ्या उडतील असं राऊत म्हणाले. त्यावर एकनाथ शिंदेंनी पलटवार केलाय. सध्या मनोमीलन नाटकाचे प्रयोग रंगलेत, असे शिंदे म्हणाले.

advertisement

गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं विरोधकांसोबतच भाजपचे काही नेतेही एकनाथ शिंदेंना टार्गेट करताना दिसून येतायत. त्यावरुनही शिंदेंनी थेट इशारा दिलाय.. आपला एकच अॅटमबॉम्ब काम तमाम करणार, असे शिंदे म्हणाले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यात सुरू केली फूड स्कॉलरशिप, कुलदीप यांचे काम पाहून तुम्हीही कराल कौतुक!
सर्व पहा

महापालिका निवडणुकांचं घोडामैदान जवळ आलंय. दिवाळीनंतर म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळेच पक्ष कामाला लागले असून वादांचे हे फटाके दिवाळीनंतरही फुटत राहणारेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
स्वबळावरून धुसफूस, आपण थेट ॲटम बॉम्ब लावू, एकनाथ शिंदे यांचं नाईकांसह भाजपला आव्हान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल