जालना जिल्ह्यातील पिंपरी येथील रहिवाशी दादाराव अंभोरे यांनी आपल्या गट क्रमांक 23 येथील अडीच एकर शेतामध्ये मक्याची लागवड केली होती. नुकतीच त्यांनी मक्याची सोंगणी केली असून मक्याची कणसे गंजी मारून ठेवली होती. या बाजूलाच मक्याचा कडबा देखील होता. अज्ञात व्यक्तीने मका आणि कडबा या दोन्ही वस्तूंना आगीच्या हवाली केल्याने काहीच क्षणात मका आणि कडबा जळू नष्ट झालेय.
advertisement
तब्बल 100 क्विंटल मका डोळ्यादेखत जळत असल्याचं पाहून शेतकर्याच्या हृदयाला पिळ पडल्याचे पाहायला मिळालं. शेतकरी आधीच आसमानी आणि सुलतानी संकटांनी हवाल झाला आहे. सरकार देखील शेतकर्यांच्या वाईटावरच आहे. त्यात अशी संकटे शेतकर्यांना उभे राहू देत नाहीत. त्यामुळे आम्ही पंचक्रोशीतील शेतकरी या शेतकर्याला होईल तशी मदत करत आहे, तुम्ही सर्व शेतकरी देखील संबंधित शेतकऱ्याला भरभरून मदत करा आणि त्याला उभं राहण्यास बळ द्या असं आवाहन गावातील एका शेतकऱ्याने केले.
दरम्यान, मका पिकाला बाजारामध्ये आद्रतेनुसार 1200 ते 1800 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतोय. बाजारभावानुसार ही मका दीड ते दोन लाख रुपये किंमतीची होती. तर 25 ते 30 हजार रूपयांचा मक्याचा कडबा देखील होता. या शेतकर्याचे जवळपास दोन ते अडीच लाखांचे नुकसान झालं असून पोलीसांनी घटना स्थळी पोहोचून पुढील कारवाई सुरू केली आहे.