वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील कामरगावच्या जय भवानी या शेतकरी सदस्य असलेल्या गणेश मंडळाकडून लाल सुपारी पासून गणेश मूर्ती साकारली आहे. या मूर्तीची परिसरात चर्चा असून एक आगळी-वेगळी पर्यावरण पूरक अशी गणेश मूर्ती सणांमध्ये पर्यावरणाचा संदेश देणारी ठरली आहे.
advertisement
या गणेश मूर्तीची उंची 4 फूट असून या मूर्तीसाठी 9 किलो लाल सुपारीचा वापर करण्यात आला आहे. या मूर्तीला लागणारी सुपारी जय भवानी गणेश मंडळाच्या प्रत्येक शेतकरी सदस्याने एक एक किलो आणून हा पर्यावरण पूरक बाप्पा साकारण्यात आला आहे.
लाल सुपारीला हिंदू धर्मात आणि विशेषतः गणेश पूजेमध्ये गणपतीचे प्रतीक मानले जाते. तसेच हिंदू धर्मात लाल सुपारीला शुभ आणि समृद्धी आणणारी मानले जाते. प्रत्येक शुभकार्याची सुरुवात करताना पूजेत अगोदर लाल सुपारीचा वापर केला जातो. कामरगावच्या जय भवानी गणेश मंडळाच्या लाल सुपारी पासून बनविलेल्या पर्यावरण पूरक बाप्पाला पाहण्यासाठी भाविक गर्दी करताना दिसत आहेत.
गणपतीला दुर्वाच का वाहतात, तुळस का वाहत नाहीत? अशी आहे त्यामागची कथा
गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण त्याचबरोबर तो पर्यावरणासाठी एक आव्हानही बनत चालला आहे. पारंपरिक मूर्ती बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिस (PoP) मुळे जलप्रदूषण वाढते आणि पर्यावरणाची हानी होते. यामुळेच, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे काळाची गरज बनली आहे. त्याचे अनेक फायदे आहेत. मातीच्या किंवा इतर नैसर्गिक वस्तूंपासून बनवलेल्या मूर्ती पाण्यात सहज विरघळतात. यामुळे पाणी दूषित होत नाही. PoP च्या मूर्ती विरघळण्यासाठी खूप वेळ लागतो आणि त्यामध्ये असलेले रासायनिक पदार्थ जलचरांसाठी (पाण्यातील जीव) हानिकारक असतात. पर्यावरणाची काळजी घेऊन उत्सव साजरा केल्यास नद्या, तलाव आणि समुद्राचे पाणी स्वच्छ राहण्यास मदत होते.