TRENDING:

Nagpur : ईव्हीएम नेणाऱ्या गाडीवर हल्ला, तोडफोड प्रकरणी काँग्रेसच्या उमेदवारावर गुन्हा दाखल

Last Updated:

मध्य नागपूर मतदारसंघात घडलेल्या या घटनेप्रकरणी आता काँग्रेसच्या उमेदवारासह २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात २० नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली. यात नागपूरमध्ये निवडणूक आयोगाच्या वाहनाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली होती. मध्य नागपूर मतदारसंघात घडलेल्या या घटनेप्रकरणी आता काँग्रेसच्या उमेदवारासह २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांच्यावर दंगल घडवणे, सरकारी कर्मचारी हल्ला, सरकारी कामात अडथळा, वाहनांची तोडफोड करणे या सह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ईव्हीएम नेणाऱ्या वाहनावर हल्ला
ईव्हीएम नेणाऱ्या वाहनावर हल्ला
advertisement

विधानसभेसाठी मध्य नागपूर मतदारसंघात मतदान केंद्रावरून EVM घेऊन निघालेल्या गाड्यांची लोखंडी रोडने तोडफोड केली होती. या घटनेमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली होती. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी घडलेल्या घटनेनंतर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात मोठी घसरण, शनिवारी सोयाबीन आणि कांद्याला किती मिळाला दर?
सर्व पहा

मतदानाच्या दिवशी नाईक तलाव परिसरात काँग्रेसच्या प्रचार कार्यालयात पाचशे रुपये असलेले लिफाफे सापडले होते. त्याप्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा केला. गुन्हे दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे असून अद्यापही या प्रकरणी कोणाला अटक झाली नाहीये.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagpur : ईव्हीएम नेणाऱ्या गाडीवर हल्ला, तोडफोड प्रकरणी काँग्रेसच्या उमेदवारावर गुन्हा दाखल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल