बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी बीडमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पण त्यांचा हा दौरा वादात अडकला आहे. कपडे खराब होतील म्हणून पूरग्रस्त भागातील ग्रामस्थांनाच खासदार सोनवणे बसलेली होडी ओढावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते मोहन जगताप यांचाही दौऱ्यामध्ये सहभाग आहे.
बीडच्या माजलगाव मधील गोदावरी नदी काठच्या पूर्वग्रस्त भागात आज बजरंग सोनवणे यांनी दौरा केला. गावात शिरलेले पाणी पाहण्यासाठी सोनवणे गेले होते. पण पाणी जास्त असल्यामुळे खासदार सोनवणे काही पाण्यात उतरले नाही. एका थर्माकॉलच्या होडीवर खासदार सोनवणे बसले, त्यांच्यामागे मोहन जगताप आणि आणखी एक कार्यकर्ता होता. तर चार तरुण हे मानेपर्यंत असलेल्या पाण्यात उतरलेले होते. हे तरुण खासदारसाहेबांची होडी ओढत होते.
advertisement
खासदार सोनवणे ज्या प्रकारे होडीवर बसले होते, ते पाहून सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले आहे. कपडे खराब होऊ नये म्हणून सोनवणे असा प्रवास करत होते, का असं म्हणत या व्हिडिओवरून बजरंग सोनवणेंना ट्रोल केलं जात आहे. सोनवणे यांच्याकडून मात्र कोणताही खुलासा करण्यात आला नाही. मात्र, हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.