पावसामुळे फुलांवर परिणाम
गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांकडून फुलांची आवक घटली आहे. भिजलेला माल वजनाला हलका व टिकायला कमी असल्याने विक्रेत्यांनी शेतकऱ्यांकडून सुकी फुलं खरेदी करण्यास प्राधान्य दिलं आहे. त्यामुळेच बाजारात फुलांचा तुटवडा निर्माण होऊन दर वाढले आहेत. मुंबई आणि ठाण्याला नाशिक, पुणे, कोल्हापूर, चाकण, तळेगाव, आळंदी या भागांतून फुलांचा पुरवठा होतो.
advertisement
Ganesh Visarjan 2025: गणेश विसर्जनासाठी मुंबईमध्ये 275 कृत्रिम तलाव, पाहा कुठे आणि किती आहेत?
ठाणे बाजारपेठेतील फुलांचे दर
शेवंती 400 रुपये किलो, जाई, जुई 2400 रुपये किलो, कामिनी 50 रुपयांना एक, गुलछडी 600 रुपये किलो, सायली 2400 रुपये किलो, दूर्वा 50 रुपये जुडी, गुलाब 150 ते 200 रुपये बंडल, चाफा 800 रुपये शेकडा, हार 50 रुपयांपासून पुढे, सुका झेंडू 150 रुपये किलो, भिजलेला झेंडू 80 रुपये किलो, जास्वंद 1200 रुपये शेकडा, ऑर्किड कंठी 400 रुपये, गुलाब कंठी 300 रुपये, चाफा कंठी 500 रुपये, निशिगंधा 200रुपये 10 नग, लीली 1000 रुपये किलो, दांडी शेवंती 400 रुपये किलो, मोगरा 2200 रुपये किलो, ऑर्किड 800 रुपये किलो, वेणी 30 रुपयांपासून पुढे.
गणेशभक्तांची खरेदीसाठी धावपळ
गावी जाणाऱ्या भक्तांनी सोमवारीच फुले खरेदी केली, तर स्थानिकांनी मंगळवारी बाजारात गर्दी केली होती. गणेशाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर बाजारात गर्दी कमी झाली असली तरी अनंत चतुर्दशीपर्यंत फुलांचे दर वाढलेलेच असतील, असं विक्रेत्यांनी सांगितलं.
