Ganesh Visarjan 2025: गणेश विसर्जनासाठी मुंबईमध्ये 275 कृत्रिम तलाव, पाहा कुठे आणि किती आहेत?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
BMC Set Up 275 Artificial Ponds: मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलेल्या निर्देशांचे पालन करत बृहन्मुंबई महानगरपालिकेने यावर्षी गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी शहरातील वेगवेगळ्या विभागात अधिकाधिक कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे.
राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. मुंबईसह पुण्यामध्ये या सणाची फार मोठी क्रेझ आहे. 27 ऑगस्टला संपूर्ण राज्यात, ढोल ताशाच्या गजरामध्ये लाडक्या गणरायाचे आगमन झाले. अलीकडेच, मुंबई उच्च न्यायालयाने गणेश मुर्तींच्या विसर्जनासाठी काही नियम अनिवार्य केले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलेल्या निर्देशांचे पालन करत बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) यावर्षी गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी शहरातील वेगवेगळ्या विभागात अधिकाधिक कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी तलावांची संख्या 71 ने वाढवली आहे. गणेशोत्सवात आणि नवरात्रोत्सवात 6 फूट उंचीपर्यंतच्या प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्ती फक्त कृत्रिम तलावांमध्येच विसर्जित कराव्यात, असे निर्देश हायकोर्टाने दिले होते.
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन करत बृहन्मुंबई महानगरपालिकेने यावर्षी गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी शहरातील वेगवेगळ्या विभागात २७५ कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. गेल्यावर्षी हाच आकडा २०४ इतका होता. पण यावर्षी महानगरपालिकेने थेट ७१ कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. कृत्रिम तलावांमध्ये न्यायालयाने यंदा सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करणे अनिवार्य केले आहे. याशिवाय, घरगुती गणेशमूर्तींचे बादली किंवा पिंपात विसर्जन करण्याचा पर्याय अवलंबण्याचे आवाहन महापालिकेतर्फे नागरिकांना केले गेले आहे. याशिवाय, महानगरपालिकेने गिरगाव चौपाटीवरही एकूण पाच कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे, जिथे घरगुती गणपतींचे विसर्जन केले जाऊ शकते. यावर्षी मोठ्या प्रमाणावर तलावांची संख्या महानगरपालिकेने वाढवली आहे.
advertisement
सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल उच्च न्यायालयाने दिलेले आदेश आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यासाठी महानगरपालिकेने नियोजन सुरू केले आहे. विसर्जनानंतर गणेशमूर्तींवर प्रक्रिया करण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करण्यात आली असून या कार्यपद्धतीनुसार मूर्ती विसर्जनानंतर त्यांची पुनर्प्राप्ती आणि पुनर्प्रक्रिया केली जाणार आहे. निसर्गस्नेही आणि प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिकेने कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. या तलावांची यादी महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. कृत्रिम तलावांची यादी पाहण्यासाठीचे क्यूआर कोड महानगरपालिकेने विविध माध्यमातून प्रकाशित केले आहेत. त्यानुसार घरानजीकचा तलाव शोधून तेथे मूर्ती विसर्जित करावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने गणेश भक्तांना केले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 27, 2025 4:13 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Ganesh Visarjan 2025: गणेश विसर्जनासाठी मुंबईमध्ये 275 कृत्रिम तलाव, पाहा कुठे आणि किती आहेत?


