भंडारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा स्टेडियमवर ही घटना घडली आहे. बाजीराव चिंधालोरे (60 वर्षे) असे सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याचे नाव होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी डॉ. झंवर यांच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. विशेष म्हणजे नुकताच त्यांचा सेवानिवृत्ती सोहळा पार पडला होता.
advertisement
खेळताना अचनाक कोसळले
समोर आलेल्या माहितीनुसार, बाजीराव चिंधालोरे यांना बॅडमिंटन खेळण्याची आवड होती. निवृत्त झाल्यानंतर रोज बॅडमिंटनन खेळण्यासाठी येत होते. रोज नित्यनियमाने बॅडमिंटन खेळायचे. मात्र खेळता खेळता अचनाक खाली कोसळले आणि जागेवरच त्यांचा मृत्यू झाला ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
चिंधलारे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर
रोज उत्साहात खेळणारे बाजीराव चिंधलारे खेळताना एकदत तंदुरुस्त आणि फिट होते. विशेष म्हणजे त्यांची शरीरयष्टी पाहून असा काही प्रकार घडेल असे कोणालाही वाटत नाही.
खाली कोसळतात आणि त्यातच त्यांचा मृत्यू होते. या अकस्मात निधनामुळे त्यांच्या सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला असून चिंधलारे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.