उद्यापासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार असून या अधिवेशनासाठी संजय राऊत दिल्लीत दाखल झाले आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संजय राऊतांना खळबळजनक दावा केला आहे. दावा करताना त्यांनी कोणत्याही मंत्र्याच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. फडणवीस सरकारमध्ये जे वादग्रस्त मंत्री आहे त्यातील पाच मंत्री घरी जाणार आहे, अशा आशयाचे ट्वीट संजय राऊतांनी केले आहे.
advertisement
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
फडणवीस मंत्रिमंडळात रम रमी रमा रमणी! मी दिल्लीत आहे. चार मंत्री नक्की घरी जात आहेत; पाचवा गटांगळ्या खात आहे. मिंधे अजित दादांचे मुख्य नेते अमित शहा यांनी निर्णय घेतला! महाराष्ट्रात वेगवान घडामोडी लवकरच सुरू होतील.
संजय राऊतांच्या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांनाउधाण आले आहे. वादग्रस्त कारकीर्द असलेल्या मंत्र्यांच्या नावांची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे संजय राऊतांनी हे ट्वीट करताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रम्मी खेळतानाचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे