सुरजागड प्रकल्पावरून माओवाद्यांनी या भागाचे आमदार आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव आत्राम यांना तब्बल तिसऱ्यांदा धमकी दिली आहे. या संदर्भात गट्टा येथे पत्रके आढळली असून माओवाद्यांनी त्यात धर्मराव बाबा आत्राम यांच्यासह त्यांचे जावई ऋतुराज त्यांचे भाऊ यासह कंपनीसाठी काम करणाऱ्या काही लोकांची नावे नमूद केली आहेत. सुरजागड येथील लोह खनिज उत्खननासाठी धर्मराव हे जबाबदार असून त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल असा धमकीवजा इशारा माओवाद्यांच्या त्या पत्रकात देण्यात आला आहे.
advertisement
राष्ट्रवादीत चाललंय काय? शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांची दिल्लीत भेट, सोबतच जेवण; चर्चेला उधाण
माओवाद्यांच्या पश्चिम सब झोनल ब्युरोचे श्रीनिवास यांच्या नावाने हे पत्रक या ठिकाणी आढळले आहे. वर्षभरात धर्मरावा बाबा यांना तब्बल तिसऱ्यांदा माओवाद्यांची अशी धमकी आली आहे .गेल्यावेळी हिवाळी अधिवेशनातही माओवाद्यांनी धर्मराव आत्राम यांना धमकी दिली होती. त्यानंतर सरकारने त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचे निर्देश दिले होते.
