अमरोतीन रोहिदास बंजार (वय 33 असे मृत महिलेचे नाव असून तिचा पती रोहिदास बिरसिंग बंजार (37) बेतकाठी गावात राहणारे हे जोडपे मोलमजुरी करायचे. पहाटे 3 वाजता पती रोहिदास याने पत्नीवर धारदार कुऱ्हाडीने हल्ला केला. यात ती जागीच ठार झाली. आठ वर्ष वयाच्या मुलीसमोर त्याने ही हत्या केली. त्यानंतर निर्दयी रोहिदास बंजार हाती कुऱ्हाड घेऊन बाजार चौकात गेला. रक्ताने माखलेली कुऱ्हाड दाखवत भल्या पहाटे फिरून काही वेळाने कुऱ्हाड पाण्याने धुवून घरामागे झुडुपात फेकून दिली. मोठ्या भावाने गावातील युवकांच्या मदतीने त्यास पकडून घरी खुर्चीत बसवले व खांबाला दोरीने बांधून ठेवले व नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.
advertisement
वाचा - नवरात्रीची पूजा पूर्ण करण्यासाठी भाच्याचा बळी; महिन्याभरानंतर फुटलं आत्याचं बिंग
चार बहिणी प्रेमाला पारख्या
अमरोतीन व रोहिदास यांना चार मुली आहेत. आईची हत्या, वडील तुरुंगात गेल्याने या चार बहिणींचा आधार हरवला आहे. त्या आई-वडिलांच्या प्रेमाला पारख्या झाल्या आहेत. 15 वर्षांची माधुरी नववीत, 13 वर्षांची मनीषा सातवीत, 11 वर्षीय कौशल्या पाचवीत तर 8 वर्षांची वैशाली दुसरीत शिक्षण घेत आहे. या घटनेने चौघी बहिणींचं जीवन पालकांविना पोरक झालं आहे.
