Crime News : नवरात्रीची पूजा पूर्ण करण्यासाठी दिला भाच्याचा बळी; महिन्याभरानंतर फुटलं आत्याचं बिंग
- Published by:Shreyas
- trending desk
Last Updated:
दिवसेंदिवस माणुसकी नाहीशी होत चालल्याचं चित्र आहे. रक्ताच्या नात्याबद्दलही लोकांच्या मनात करुणा राहिलेली नाही. आत्या आणि तिच्या नवऱ्याने भाच्याचा नरबळी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
मुंबई : दिवसेंदिवस माणुसकी नाहीशी होत चालल्याचं चित्र आहे. रक्ताच्या नात्याबद्दलही लोकांच्या मनात करुणा राहिलेली नाही. छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यात नात्यांना काळिमा फासणारी घटना घडली आहे. गेल्या महिन्यात पटणा पोलीस स्टेशन हद्दीतल्या खोंड गावात 24 वर्षांच्या एका मुलाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची पोलिसांनी उकल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाची आत्या आणि तिच्या पतीने मिळून या तरुणाचा खून केला होता. खुनानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी विहिरीजवळ नेला होता; मात्र कोणाची तरी चाहूल लागल्याने मृतदेह विहिरीबाहेर सोडून पळ काढला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
अंधश्रद्धेतून दिला भाच्याचा बळी?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चैत्र नवरात्रीची पूजा पूर्ण करण्यासाठी जोडप्याने आपल्या भाच्याचा बळी दिला. शानू पनिका उर्फ धनेश्वर हा चैत्र नवरात्रीच्या काळात रात्री आपली आत्या अमरावती देवीच्या घरी थांबत होता. नवरात्रीच्या जवारा पूजेला 12 वर्षं पूर्ण झाल्यामुळे अंधश्रद्धेपोटी आत्याला भाच्याचे केस आणि नखांची आहुती द्यायची होती. घटना घडली त्या रात्री शानू गच्चीवर झोपला होता. आरोपी दाम्पत्याने त्याचे केस आणि नखं कापण्याचा प्रयत्न केला; पण शानूने त्यांना विरोध केला. यानंतर आत्याचा पती बजरंग याने गळ्यातल्या उपरण्याने शानूचा गळा दाबण्यास सुरुवात केली आणि आत्याने शेजारी पडलेल्या लोखंडी पहारीने त्याच्यावर पाठीमागून हल्ला केला. यात शानूचा मृत्यू झाला. यानंतर दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.
advertisement
शानूचा मृतदेह आत्याच्या घराबाहेर असलेल्या विहिरीजवळ सापडला होता. त्याच्या दोन्ही पायावर ओरखडे आणि पायाची नखंही उपटलेली दिसत होती. त्याच्या डोक्यावर जखमेच्या खुणाही आढळल्या होत्या. त्यामुळे कुटुंबीयांनी खुनाचा संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम केलं. त्यातून हत्येचं प्रकरण उघडकीस आलं. पोलिसांनी शानूच्या आत्याची आणि तिच्या पतीची चौकशी केली. सुरुवातीला त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
advertisement
पोलिसांनी आरोपी आत्या अमरावती देवी आणि तिचा पती बजरंग यांच्याविरुद्ध आयपीसी कलम 302, 201, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक करून कोर्टात हजर केलं. कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी सांगितलं, की महिनाभरापूर्वी (19 एप्रिल) शानूचा मृतदेह सापडला होता. त्याच दिवशी सकाळी आठ वाजता मृताचा भाऊ अमित याने पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. अमितने भावाच्या खुनाचा संशय व्यक्त केला होता.
view commentsLocation :
Koriya,Chhattisgarh
First Published :
May 28, 2024 11:46 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Crime News : नवरात्रीची पूजा पूर्ण करण्यासाठी दिला भाच्याचा बळी; महिन्याभरानंतर फुटलं आत्याचं बिंग


