Modi-Trump Call: Thank You Trump... पीएम मोदींना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा फोन, कोणत्या मुद्यावर झाली चर्चा?

Last Updated:

PM Modi Donald Trump News: मेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

Modi-Trump Call: थँक यू ट्र्म्प, पीएम मोदींना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा फोन, कोणत्या मुद्यावर झाली चर्चा?
Modi-Trump Call: थँक यू ट्र्म्प, पीएम मोदींना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा फोन, कोणत्या मुद्यावर झाली चर्चा?
PM Modi Donald Trump News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. दिवाळीच्या खास प्रसंगी पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. या दोन्ही नेत्यांमध्ये विविध मु्द्यांवर चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांनी फोनवरून चर्चा झाल्याची माहिती दिली आहेत.
advertisement
पंतप्रधान मोदी यांनी सोशल मिडिया पोस्टद्वारे या फोनवरील चर्चेची माहिती दिली. पंतप्रधान मोदी म्हटले की, " फोन कॉल केल्याबद्दल आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. प्रकाशाच्या या सणानिमित्त, आपले दोन्ही महान लोकशाही राष्ट्र जगासाठी आशेचा किरण बनू आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध एकत्र उभे राहू, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
advertisement
advertisement
व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि पाकिस्तानशी युद्ध टाळण्याची गरज यावर चर्चा केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना एक चांगली व्यक्ती आणि खूप चांगला मित्र म्हणून वर्णन केले. ट्रम्प म्हणाले की पंतप्रधान मोदी एक चांगली व्यक्ती आहेत आणि गेल्या काही वर्षांत त्यांनी त्यांच्याशी चांगली मैत्री निर्माण केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दीप प्रज्वलीत करून दिवाळी उत्सवाचे औपचारिक उद्घाटन केले.
advertisement

ट्रम्प काय म्हणाले?

दिवाळी उत्सवादरम्यान, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "मला भारतातील लोक खूप आवडतात. आम्ही आमच्या देशांमधील काही उत्तम करारांवर काम करत आहोत. मी आज पंतप्रधान मोदींशी बोललो आणि आमचे खूप चांगले संबंध आहेत. ते रशियाकडून अधिक तेल खरेदी करणार नाहीत. त्यांना माझ्याप्रमाणेच ते युद्ध संपलेले पहायचे आहे. त्यांना रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपलेले पहायचे आहे. ते जास्त तेल खरेदी करणार नाहीत. म्हणून त्यांनी त्यात लक्षणीय कपात केली आहे आणि ते अजूनही कपात करत आहेत..." व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी उत्सवादरम्यान अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय क्वात्रा यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानले.
advertisement
view comments
मराठी बातम्या/देश/
Modi-Trump Call: Thank You Trump... पीएम मोदींना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा फोन, कोणत्या मुद्यावर झाली चर्चा?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement