दरम्यान पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती तायमिन शेख यानं नदीवर जाऊन आंघोळ केली, आणि रक्तानं माखलेले कपडे धुतले. त्यानंतर त्याने सरळ पोलीस स्टेनश गाठून आपण पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे मृत राहत सय्यद यांचा पती आरोपी तायमिन शेख याला काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधल्या रायपूर येथे हरणाची शिंगे विक्री प्रकरणात अटक झाली होती. १५ दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून आलेला होता. लग्नाआधी तो मुंबईत फुटपाथावर साहित्य विक्रीचे काम करायचा. लग्नानंतर तायमिन आणि राहत हे दाम्पत्य राहतच्या माहेरीच राहात होते. नेमकी कोणत्या कारणातून ही हत्या झाली हे अद्याप समोर आलेले नाहीये.
advertisement
Location :
Gadchiroli,Gadchiroli,Maharashtra
First Published :
September 15, 2023 12:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गडचिरोली/
खळबळजनक! ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या शहराध्यक्षांची हत्या; पतीनेच केला खून
