TRENDING:

Telangana Assembly Elections : BRS चा गड एकनाथ शिंदे यांच्या सभेने कसा ढासळला? कसं होतं प्लानिंग?

Last Updated:

Telangana Assembly Elections : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेलंगणा विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा प्रचार केला होता. हा उमेदवार चांगल्या मताधिक्यांनी निवडूण आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गडचिरोली, 8 डिसेंबर (महेश तिवारी, प्रतिनिधी) : भारत राष्ट्र समितीचा गड अशी ओळख असलेल्या सर्वाधिक मराठी भाषिक मतदार असलेल्या आदिलाबाद मतदारसंघात चार वेळा आमदार असलेले बीआरएसचे जोग रामण्णा यांचा अखेर पराभव झाला. मराठी अस्मिता, हिंदुत्व आणि शिवाजी महाराजांचे घेतलेले नाव यावरून त्या मतदारसंघातील मराठी भाषिक मतदारांनी एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत केलेल्या मतदानामुळे भारत राष्ट्र समितीचा चार निवडणुकांपासून असलेला हा बालेकिल्ला अखेर ढासळला. या ठिकाणी पहिल्यांदाच भाजपचा उमेदवार निवडून आला असून एकनाथ शिंदेंच्या रोडशो आणि जाहीर सभांनी यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, हे आता स्पष्ट झाले आहे.
BRS चा गड एकनाथ शिंदे यांच्या सभेने कसा ढासळला?
BRS चा गड एकनाथ शिंदे यांच्या सभेने कसा ढासळला?
advertisement

तेलंगणाचा आदिलाबाद जिल्हा चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्याला लागून आहे. आदिलाबाद मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक मतदार आहेत. बैला, जैनत, आदीलाबाद या तीनही तालुक्यात मराठी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. राजकीय दृष्ट्या हा मतदारसंघ पूर्वाश्रमीचा तेलंगणा राष्ट्र समिती आणि आत्ताचा भारत राष्ट्र समितीचा गड म्हणून ओळखला जातो. पहिल्यांदा तेलगू देशम पक्षाकडून आणि नंतर तीनही विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीकडून जोग रामण्णा या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने आव्हान उभे करण्याचा प्रयत्न गेल्या दोन निवडणुकांपासून केलेला आहे. मात्र, त्यात त्यांना यश आलेलं नाही.

advertisement

गेल्या निवडणुकीत भाजपकडून पायल शंकर पराभूत झाले होते. यावेळी पक्षाने परत एकदा पायल शंकर यांना या आदिलाबाद मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक मतदार असलेल्या या मतदारसंघात भाजपच्य उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रदेश भाजप नेतृत्वाकडून प्रयत्न सुरू होते. या मतदारसंघात असलेल्या मराठी भाषिकांची संख्या लक्षात घेता या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणुकीच्या 48 तास अगोदर आदिलाबादमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो आणि स्थानिक आंबेडकर चौकात जाहीर सभा पार पडली. त्या सभेत मुख्यमंत्र्यांना मिळालेला प्रतिसाद हा अभूतपूर्व होता.

advertisement

आदिलाबाद शहरातील मतदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला जय तेलंगणा असे अभिवादन करत काही वाक्य तेलगूमध्ये नंतर हिंदीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीआरएस नेतृत्वावर तीव्र शब्दात टीका केली. महाराष्ट्राच्या सीमेवर बांधण्यात आलेल्या मेडीगड्डा कालेश्वर सिंचन प्रकल्पात कशा पद्धतीने भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे त्या प्रकल्पाची दुरावस्था झाल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. शासकीय योजनांचा गरजू व्यक्तींना लाभ मिळत नाही. शासकीय योजनांमध्ये कशा पद्धतीने भ्रष्टाचार सुरू आहे, तेलंगणातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कुठलीही व्यवस्था नसल्याने ते महाराष्ट्रात येऊन कापूस विकतात या मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी मतदारांना मतदानासाठी साद घातली.

advertisement

शेवटी मुख्यमंत्र्यांनी मराठीतही भाषण केले. ही सभा संपताच मुख्यमंत्र्यांसोबत सेल्फी घेण्यासाठी मतदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आदिलाबादनंतर मुख्यमंत्र्यांची मोठी जाहीर सभा बेला येथे पार पडली. बेला या तालुक्यात सर्वाधिक मराठी भाषिक मतदार असून या सगळ्यांचे रोटी बेटी व्यवहार महाराष्ट्राशी आहेत. तेलंगणात हा तालुका असला तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठी बोलली जाते. अशा मराठी भाषिक मतदार असलेल्या बेला येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झालेल्या जाहीर सभेने गर्दीचे सगळे रेकॉर्ड मोडले. या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी अस्मिता, यासोबतच केंद्रातलं नरेंद्र मोदींचे सरकार, हिंदुत्व यासह शिवछत्रपतींचे नाव घेत हिंदुत्वाच्या रक्षणासाठी विकासासाठी भाजपच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले.

advertisement

वाचा - NCP : मलिकांनंतर आता पटेल रडारवर, दानवेंनी काढलं इकबाल मिर्ची कनेक्शन

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला मतदारांनी जोरदार प्रतिसाद दिला होता. यापूर्वी या भागात कधीही कुठल्याही पक्षाच्या मुख्यमंत्र्यांची सभा झाली नाही. या ठिकाणी राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या, त्या सभाना ही एकनाथ शिंदेंच्या बेला येथील सभेएवढी गर्दी कधीही दिसली नाही. असे त्या भागातील राजकीय जाणकार सांगतात. भारत राष्ट्र समितीचा गड समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघातील उमेदवार जोग रामण्णा यांच्यासाठी अनुकूल असलेलं वातावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेने पूर्णपणे बदलले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी भाजपचे पायल शंकर यांच्या पारड्यात मतदान केलं. 7000 मतांनी भाजपचे पायल शंकर यांनी भारत राष्ट्र समितीचे जोग रामण्णा यांचा पराभव केला आणि पहिल्यांदा भाजपचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/गडचिरोली/
Telangana Assembly Elections : BRS चा गड एकनाथ शिंदे यांच्या सभेने कसा ढासळला? कसं होतं प्लानिंग?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल