या देखाव्याला साजेशा बाप्पाची मूर्ती त्यानं स्थापन केलीय. त्याचा हा देखावा आणि कोळी पेहरावातील गणेश मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. मखर करताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याची मी विशेष काळजी घेतलीय. त्यामुळेच संपूर्ण मखर ही कागदी वस्तूंचा वापर करत तयार केलीय.
नागपूरकरांना अनुभवता येणार स्वराज्याची राजधानी, देखाव्यातून मांडला शिवरायांचा इतिहास
advertisement
मखर तयार करण्यासाठी सात ते आठ दिवसांचा कालावधी लागला तर गेल्या सहा वर्षांपासून गणेशोत्सवात विविध विषयांवर देखावे सादर केले आहेत. वनराई, गड किल्ले, धबधबा, महालक्ष्मी, वॉटर पार्क, आणि यंदा एकविरा आई मंदिर, साकारलं असून गणेश मूर्ती देखील त्याला साजेशी अशीच बसविण्यात आली आहे, अशी माहिती साईराजनं दिली.
129 वर्ष जुन्या गणेशोत्सवास कल्याणमध्ये थाटात सुरूवात, लोकमान्य टिळकांशी आहे जवळचा संबंध
समाजाबद्दल, पर्यावरणाबद्दल असलेलं भान सर्वांनी जपणं गरजेचं आहे. साईराजनं ते जपलंय. त्यामुळे त्याचा देखावा कुर्ला परिसरात कौतुकाचा विषय बनला असून देखावा पाहण्यासाठी गर्दी होतीय.





