TRENDING:

हुश्श! अखेर लसूण स्वस्त झाला; आता किती रुपयांना मिळतोय? पटापट पाहा नवे दर

Last Updated:

कमी प्रमाणात का होईना नवीन ओला लसूण बाजारात आला आहे. यामुळे दरात घसरण झाली आहे. बाजारामध्ये नवीन लसणाची आवक वाढली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जळगाव : गेले काही दिवस अनेकांच्या ताटातून लसूण गायब झाला होता. लसणीचे दर इतके वाढले की बहुतेकांनी लसूण घेणंच बंद केलं. काहींनी लसूण वापरणं कमी केलं. कित्येक दिवस रडवणाऱ्या लसणाचे दर आता अखेर घसरले आहेत. लसूण आता स्वस्त झाला आहे. बाजारात नवीन लसणाची आवक वाढल्याने लसणीचे दर कमी झाले आहेत.
लसणीचे दर घसरले
लसणीचे दर घसरले
advertisement

जळगावच्या भुसावळमध्ये सर्वाधिक लसूण आवक मध्य प्रदेशातून होते. मात्र तिथंही लसूण लागवड कमी झाली आहे. नवरात्रीच्या काळात अर्थात सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात लागवड झालेल्या लसणाची काढणी कमी प्रमाणात होत आहे. उत्पन्नाच्या तुलनेत केवळ 10 ते 15 टक्के काढणी झाली आहे. यामुळे दरात तेजी कायम असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं.

सुरुवातीला जो लसणाचा भाव वाढला जो किलोमागे 100 रुपयांवर गेला, मग हळूहळू ही किंमत 200 रुपये झाली, काही महिन्यांनी 300 रुपये झाली, जी आता 400वर पोहोचली आहे. दरम्यान, येत्या काळात नवं उत्पादन आल्याने हा भाव हळूहळू घसरेल, असं व्यापाऱ्यांचं मत आहे. महागड्या दरामुळे लसणाचे ग्राहक कमी झाले. 400 रुपयांवर भाव गेल्याने 1 किलोची खरेदी करणारा ग्राहक अर्धा किलो लसूण खरेदी करतोय. तर अर्धा किलो खरेदी करण्याची ऐपत असणारी व्यक्ती पाव किलोवर समाधान म्हणतेय. शिवाय 100 ग्रॅम लसूण खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढली.

advertisement

Oil Free Puri : आता तेलात नाही पाण्यात तळा पुऱ्या, ऑईल फ्री पुऱ्यांची सोपी रेसिपी नक्की ट्राय करा

आता मात्र कमी प्रमाणात का होईना नवीन ओला लसूण बाजारात आला आहे. यामुळे दरात घसरण झाली आहे. बाजारामध्ये नवीन लसणाची आवक वाढली आहे. मध्य प्रदेशातून नवीन लसूण बाजारात येण्याचं प्रमाण काही अंशी वाढलं आहे. यामुळे लसणाच्या दरात प्रतिकिलो 100 ते 140 रुपये किलोने घसरण झाली आहे. गेल्या पंधरवड्यात 400 ते 420 रुपये किलोवर असलेला लसूण सध्या 280 ते 320 रुपये किलोने मिळतो आहे.

advertisement

नवीन लसणाची काढणी होऊन तो मार्चच्या पहिल्या आठवड्यात बाजारात आला तर दर आणखी कमी होतील, असं विक्रेत्यांनी सांगितलं.  आवक वाढल्यानंतर स्थानिक मुक्ताईनगर, बोदवड इथंही दर कमी होऊ लागतील. साधारण लसणाचे दर कमी झाल्याने खरेदीकडे महिलांचा कल वाढला आहे.

Kitchen Jugaad Video - वॅसलिनचा असा वापर तुम्हाला माहितीच नसेल; गॅसला लावताच कमाल झाली

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
काळेवाडीच्या महिलांची भरारी! घरात बसून कमावले तब्बल 17 लाख, दिवाळीत असं काय केलं
सर्व पहा

सध्या बाजारात केवळ पांढरा संकरित लसूण उपलब्ध होत आहे. गावराणी लसणाची अद्याप काढणी झाला नाही.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हुश्श! अखेर लसूण स्वस्त झाला; आता किती रुपयांना मिळतोय? पटापट पाहा नवे दर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल