घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात असलेल्या एका गावात लग्न समारंभासाठी आलेल्या एका बारा वर्षांच्या चिमुकलीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. तिचे अपहरण करून नंतर हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे जिल्हा हादरला आहे. ही चिमुकली आपल्या बहिणीसोबत लग्नसमारंभासाठी या गावामध्ये आली होती. मात्र विवाहाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर अचानक ती बेपत्ता झाल्याचं लक्षात आलं. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ती कुठेच आढळून आली नाही.
advertisement
त्यानंतर सकाळी पुन्हा एकदा शोधमोहीम राबवण्यात आली. गावालगत असलेल्या जंगल परिसरात तिचा शोध घेण्यात आला. समोरचं दृष्ट पाहून ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे. ही मुलगी जंगलामध्ये मृत अवस्थेमध्ये आढळून आली आहे. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाच्या परिस्थितीवरून मुलीवर अत्याचार झाल्याच्या संशय व्यक्त केला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
