गोंदियामधील ही घटना आहे. दुर्गेश देवकरण भगत असं या व्यक्तीचे नाव आहे. 24 वर्षांचा दुर्गेश कटंगीटोला इथं राहतो. त्याच्याकडे एकूण 3 बाइक सापडल्या.
मोटारसायकल (क्र. एमएच 35 एके 8176) किंमत 30 हजार रुपये, मोटारसायकल (क्र. एमएच 35 एडी 1205) किंमत 30 हजार रुपये आणि मोटारसायकल (क्र. एमएच 35 एएफ 1311) किंमत 40 हजार रुपये अशा एक लाख रुपये किमतीच्या तीन मोटारसायकली त्याच्याकडे होत्या.
advertisement
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, त्याची चौकशी केली. तेव्हा त्याने या बाइक चोरल्याची कबुली दिली.
शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असताना चोरट्यांवर करडी नजर ठेवून बसलेल्या पोलिसांनी एकाच आरोपीकडून चोरी केलेल्या तीन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. ही कारवाई रामनगर पोलिसांनी केली आहे.
लगतच्या ग्राम कुडवा येथील रहिवासी दिव्यांश रंगलाल लिल्हारे यांनी 6 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता आपली मोटारसायकल (क्र. एमएच 35 एके 8176) रेलटोली परिसरातील आयुष हॉस्पिटलसमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली होती. याप्रकरणी त्याने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
पोलिसांनी भादंवि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी आपली सूत्रे हलवून माहितीच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू केला. शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असताना चोरट्यांवर करडी नजर ठेवून बसलेल्या पोलिसांनी एकाच आरोपीकडून चोरी केलेल्या तीन मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
