घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गोंदिया शहरातील शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या छोटा गोंदिया परिसरामध्ये पुन्हा एकदा २९ वर्षीय युवकाचा क्षुल्लक कारणातून धारदार शस्त्राने खून केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. विक्की फरकुंडे २९ वर्ष असं मृत तरुणाचं नाव आहे. विक्की हा छोटा गोंदिया परिसरातील रहिवासी आहे. मध्यरात्रीच्या सुमारास क्षुल्लक कारणातून मनात राग ठेवून शेजारी राहणाऱ्या तीन तरुणांनी विक्की याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला यात त्याचा मृत्यू झाला.
advertisement
घटनेची माहिती मिळताच गोंदिया शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून, यातील दोन जण हे अल्पवयीन आहेत. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
