आमचा जाहीरनामा काँग्रेसचा नाही तर जनतेचा : राहुल गांधी
आम्ही खूप विचारपूर्वी पक्षाचा जाहीरनामा तयार केला आहे. हजारो लोकांशी भेटून, शेतकऱ्यांशी बोलून आम्ही हा तयार केला आहे. हा आमच्या पक्षाचा नाही तर जनतेचा आहे. अदानी यांची शेअर प्राइस बघा. ज्या दिवशी मोदी सरकार येते त्या दिवशी अदानी शेअर प्राइज वाढते. महाराष्ट्र एअरपोर्ट दुसऱ्याच्या हातात होते. मग त्यांना सीबीआय दाखवून त्यांना धमकवलं जातात आणि मग अदानीला देण्यात येते. भारतात 22 असे लोक आहेत, ज्यांच्याकडे देशाची 50% सपत्ती आहे. मोदी जातीजातीत वाद लावत आहे.
advertisement
मोदींकडून जनतेचं लक्ष्य भरकटवण्याचा प्रयत्न : राहुल गांधी
सर्व वस्तूंवर टॅक्स लावला जातोय. 500 रुपयाच्या शर्टवर 18% टॅक्स. 24 तास मीडिया मोदींना दाखवत आहेत. मी कन्याकुमारीत असताना लोकांना विचारलं तर ते बेरोजगारीचा विषय सांगतात. टिव्हीवर बेरोजगारी या विषयावर काहीच दाखवत नाही. मोदी दिसतात. मीडिया म्हणते मोदी काय बोलत आहेत. लोक मरत आहेत, ते नाही दिसत. मोबाईल फोनची लाईट दाखवा आणि मीडिया म्हणते काय करत आहेत. लोकांचा लक्ष्य भरकटकण्याचं काम केलं जात आहे. मोदी म्हणतात मी ओबीसी आहे तर मग या देशात मागासवर्गीय किती लोक आहेत? जेवढी लोकसंख्या आदिवासींची आहे तितकी कुठं नाही. जनतेचा आवाज का उचलत नाही?
वाचा - अखेर नाराज भावना गवळी आल्या समोर, तिकीट का दिलं नाही, सांगितलं कारण...
भारतातले मीडिया मालकांची यादी काढा. यामध्ये एकपण आदिवासी मागासवर्गीय मिळणार नाही. भारतातली 200 मोठी कंपनीची यादी काढा आणि तिथं सांगा मागासवर्गीय किती आहे? दलित किती आहे? मी लिस्ट काढली आहे, असाच बोलत नाही. हिंदुस्तानच्या सरकारला फक्त 90 लोक चालवत आहेत. 90 पैकी एक नाव दलित आहे तर 1 नाव आदिवासी आहे. ते सर्व लहान डिपार्टमेंटमध्ये आहेत. ओबीसींसाठी काय केलं मोदींनी? गरिबांसाठी काय आणल? असे प्रश्न राहुल गांधी यांनी यावेली उपस्थित केलेत.
