याबाबत मिळालेली माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाने राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केलीय. या योजनेसाठी दाखले, कागदपत्र गोळा करण्यासाठी धावपळ करीत आहेत. त्यातच तालुक्यातील नवेगावबांध ग्रामपंचायत कार्यालयात जन्माचा दाखला मागण्यासाठी गेलेल्या युवकाच्या कानशिलात महिला सरपंचाने हाणल्याची घटना घडली. मारहाण करणाऱ्या नवेगावबांध ग्रामपंचायतच्या महिला सरपंचाचे नाव हिराबाई नीलमचंद पंधरे असे आहे.
advertisement
...तर गडकरी पंतप्रधान झाले असते, खासदार अमोल कोल्हेंचं मोठं विधान
आशिष सुभाष लंजे वय 20 हा युवक दाखला मागण्यासाठी गेला होता. त्याला पैशाचा हिशोब न दिल्याचे कारण पुढे करुन सरपंच हिराबाई पंधरे यांनी युवकाच्या कानशिलात हाणली. आशीष लंजे हा नवेगावबांध येथील रहिवाशी आहे. नवेगावबांध येथील ग्रामपंचायत वन समितीच्यावतीने राष्ट्रीय उद्यानाच्या हिलटॉप गार्डनवरती काम पाहत होता. येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांकडून प्रवेश पास देऊन पैसे गोळा करण्याचे कार्य करीत होता.
काही दिवसाआधी आशिष लंजे याला कामावरून काढण्यात आले होते. सरपंच हिराबाई पंधरे यांना आशिष लंजे यांनी पैशाचा हिशोब न दिल्यामुळे कानशिलात लगावल्याचे पोलीस स्टेशनला कबूल केले. सदर युवकाने सरपंच सौ.हिराबाई पंधरे यांच्या विरोधात पोलीस स्टेशन नवेगावबांध येथे तक्रार नोंदवली असून (BNS) भारतीय न्याय सेवे अंतर्गत 115(2) अंतर्गत एन.सी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नवेगाव बांध पोलीस करीत आहे.
