...तर गडकरी पंतप्रधान झाले असते, खासदार अमोल कोल्हेंचं मोठं विधान
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
एका मराठी माणसाला पंतप्रधान पदावर बसलेलं बघायला मिळालं असतं. आम्हाला त्याचा अभिमान वाटला असता असं कोल्हे या कार्यक्रमात म्हणाले.
चंद्रकांत फुंदे, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिक्रापूर इथं एका कार्यक्रमात बोलताना भाजपच्या कार्यकर्त्यांना चिमटा काढला. एनडीएच्या पंतप्रधान पदाचा उमेदवार नरेंद्र मोदी झाले, पण भाजपने संसदीय मंडळाची बैठक घेतली असती तर नितीन गडकरी पंतप्रधान झाले असते असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत. शिक्रापूर इथं एका उद्घाटनाच्या कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे बोलत होते.
अमोल कोल्हे यांनी म्हटलं की, भाजपने संसदीय मंडळाची बैठक न घेता थेट महायुतीच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून घोषित केले. जर ती बैठक झाली असती तर नितीन गडकरी पंतप्रधान झाले असते. ज्या नेत्याचं आम्ही नेहमी कौतुक करतो अशा एका मराठी माणसाला पंतप्रधान पदावर बसलेलं बघायला मिळालं असतं. आम्हाला त्याचा अभिमान वाटला असता असं कोल्हे या कार्यक्रमात म्हणाले.
advertisement
संसदीय मंडळाची बैठक जर झाली असती, तर ज्या नेत्याचं आम्ही कौतुक करतो कदाचित त्यांना या देशाचे पंतप्रधान म्हणून बघायला मिळालं असतं. ते भाग्य लाभलं असतं. मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होतोय हे सांगताना आम्हालाही अभिमान वाटला असता. गडकरी साहेबांनी कोणताही पक्षभेद न पाळता पक्षापलिकडे काम केलं. पुणे - नगर महामार्गाचा विषय मार्गी लावला असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 06, 2024 3:16 PM IST