बीडमध्ये नुकतीच ओबीसी जनआक्रोश मोर्चा मेळावा पार पडला. या कार्यक्रमातून पडळकर यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. यावेळी त्यांनी एका विशिष्ट समुदायाचा उल्लेख करत याच समुदायाची मुलं जिम ट्रेनर असतात असं सांगण्याचा प्रयत्न केला.
गोपीचंद पडळकर नक्की काय म्हणाले?
राज्यातील कथित जिममधील लव्ह जिहादवर भाष्य करताना गोपीचंद पडळकर म्हणाले, "हे षडयंत्र नीट समजून घ्या. हमारे भाभी का बेटा बहुत अच्छा है. अच्छा बोलता है... वो वैसा नही है... जैसा हिंदू के लिए काम करनेवाले लोग बोलते है... पण असं काही नाही. जिममध्ये जाताना ट्रेनर कोण आहे, ते बघा... आपल्या तरुण मुली जिममध्ये जात असतील, तर त्यांना समजावून सांगा. घरात योगा करा. तिकडे जिमकडे जायची आवश्यकता नाही. ते फसवतायत, ते तुमच्यावर अन्याय करतायत."
advertisement
गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले की, ओळखपत्रांशिवाय महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणांची ओळख पटवून त्यांना प्रवेश करण्यापासून रोखले पाहिजे. "यासाठी आपल्याला एक मजबूत प्रतिबंधात्मक यंत्रणा तयार करण्याची आवश्यकता आहे," असे देखील त्यांनी म्हटले आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.