सोयगाव तालुक्यात सिल्लोड आणि कन्नड असे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. तर लोकसभेसाठी जालना आणि औरंगाबाद मतदारसंघात हा तुलाका विभागला गेलाय. याच मतदारसंघात असलेल्या ग्रुप ग्रामपंचायतीत उमर विहिरे गावातील ९७२ मतदारांपैकी व़ॉर्ड क्रमांक ३ हा सिल्लोड मतदारसंघात तर वॉर्ड क्रमांक एक आणि दोन हा कन्नड मतदारसंघात आहे.
ग्रुप ग्रामपंचायतीतील तिखी गाव वॉर्ड क्रमांक तीनमध्ये येतं. हे सिल्लोड मतदारसंघात आहेत. तर निमखेडी वॉर्ड क्रमांक एक आणि विहिरेतील मतदार कन्नड मतदारसंघात मतदान करतात. यामुळे गावाला दोन आमदार, दोन खासदार असल्याचं चित्र आहे.
advertisement
कन्नड आणि सिल्लोड या दोन मतदारसंघात ग्रामपंचायतीची विभागणी झालीय. या गावातल्या तिन्ही प्रभागात वेगवेगळ्या ठिकाणी तीन मतदान केंद्र आहेत. त्यात एक मतदान केंद्र सिल्लोडसाठी तर दोन मतदान केंद्र कन्नड मतदारसंघासाठी आहेत. इथं प्रचारासाठी येणाऱ्या उमेदवारांचीसुद्धा पंचाईत होते. स्थानिक ग्रामस्थ सोबत असल्याशिवाय आपला मतदार कोण हेच उमेदवारांना कळत नाही.
