नेमकं प्रकरण काय?
कळमनुरी तालुक्यातील दाभडी येथील रहिवासी असलेले नवनाथ दिगंबर बोंढारे (वय २६) यांच्या गावातील राहत्या घरी आणि चुलत भावाच्या नवीन बांधकाम केलेल्या घरात २१ मे रोजी रात्री साडेनऊ वाजता ते २३ मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कोणी तरी अज्ञात व्यक्तीने भानामती करण्याच्या उद्देशाने पूजा मांडली. पूजेमध्ये हळद-कुंकू, अक्षता, बिबे, कागदी चिठ्ठयांची मांडणी ठेवून काही चिठ्ठयाही टाकल्या होत्या. पूजा मांडली त्या ठिकाणी नवीन दुचाकी ठेवली होती. त्या गाडीची सीट पेटवून दिली, तसेच भावाच्या पत्नीचे कपडेही पेटवून दिले.
advertisement
दोन दिवसांत तीन वेळा वाळू घातलेल्या साड्या, बाथरूम जवळ ठेवलेले कपडे, अंगणात वाळू घातलेले साडी जाळली, एका चिठ्ठीमध्ये 'तू बांधलेले घर पाड नाही तर तुझ्या बायकोला जिवे मारतो,' असे लिहिलेले आढळले आहे. या सगळ्या प्रकारामुळे भयभीत झालेल्या नवनाथ दिगंबर बोंढारे यांच्या तक्रारीवरून बाळापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध जादूटोणा केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास केला जात आहे.
अवघ्या दोन तीनवेळा असा अघोरी प्रकार घडल्याने बोंढारे कुटुंबासह आसपासचे सर्व नागरिक भयभयीत झाले आहेत. हा भानामतीचा प्रकार नक्की कुणी केला? बोंढारे कुटुंबीयांची कुणाशी दुश्मनी आहे का? याचा तपासही पोलीस करत आहेत.