TRENDING:

Hingoli Farmers : कुणी किडनी घेतं का किडनी? कर्ज फेडण्यासाठी जगाच्या पोशिंद्याची दयनीय अवस्था!

Last Updated:

Hingoli Farmers : हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर फेडण्यासाठी चक्क अवयव विक्रीला काढले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हिंगोली, 22 नोव्हेंबर (मनीष खरात, प्रतिनिधी) : मागील तीन-चार वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात यंदा पावसाने दडी मारल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आत्महत्यांचा वेग वाढला आहे. गेल्या आठ महिन्यात तब्बल 685 शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केली आहे. म्हणजेच दिवसाकाठी 2 ते 3 शेतकरी आत्महत्या होत आहेत. आजच अमरावतीत विष पिऊन एका शेतकऱ्याने जीवन संपवलं. ही घटना ताजी असताना एक धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यातून समोर आली आहे. येथील एका शेतकऱ्यांनी बँकाचे कर्ज फेडण्यासाठी चक्क स्वतःचे अवयव विक्रीला काढले आहेत.
हिंगोलीत बँकांचे कर्ज फेडण्यासाठी चक्क अवयव काढले विक्रीला
हिंगोलीत बँकांचे कर्ज फेडण्यासाठी चक्क अवयव काढले विक्रीला
advertisement

हिंगोलीतील माझोड, ताकतोडा, गोरेगाव, केंद्रा बुद्रुक या गावांतील दहा शेतकऱ्यांनी बँकांचे कर्ज फेडण्यासाठी चक्क स्वतःचे अवयवच विक्रीला काढले आहेत. आमचे किडनी, लिव्हर, डोळे हे अवयव खरेदी करा अशी विनंती त्यांनी शासनाला केली आहे, या शेतकऱ्यांनी तसे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. जिल्ह्यात यंदा पावसाचा खंड पडला, त्याचबरोबर सोयाबीनवर यलो मोझॅक रोग आला. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. परंतु, आम्हाला शासनाचे अनुदान मिळाले नाही किंवा पिक विमा देखील मिळाला नाही, त्यामुळे बँकांचे पिक कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न या शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. स्वतःचे अवयव विक्री करण्याचे हे दरपत्रक सध्या व्हायरल होत आहे.

advertisement

अमरावती शेतकऱ्याने संपवलं जीवन

विदर्भात आत्महत्या सत्र सुरूच आहे. आज अमरावतीत विष पिऊन शेतकऱ्याने आत्महत्या केली. पुरुषोत्तम काळे असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. सततची नपिकी, डोक्यावर वाढता कर्जाचा डोंगर या विवंचनेतून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. शेतात जाऊन विषाचा घोट घेत आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

advertisement

वाचा - 'आमच्यात माणुसकी म्हणून एकाच फोटोवर..' संजय राऊतांनी बावनकुळेंना पुन्हा डिवचलं

आत्महत्यांचा वेग चिंताजनक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

गेल्या आठ महिन्यांत म्हणजेच 1 जानेवारी पासून ते 31 ऑगस्टपर्यंत मराठवाड्यातील तब्बल 685 शेतकऱ्यांनी विविध कारणांनी आपले जीवन संपवले आहे. दररोज तीन शेतकरी आपले जीवन संपवत आहेत. गेल्यावर्षी म्हणजेच 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2022 या काळात मराठवाड्यात 1 हजार 22 शेतकरी आत्महत्येची नोंद झाली होती. असे असताना यावर्षी आठ महिन्यातच 685 वर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. तसेच मराठवाड्यातील आत्महत्यांचा हा वेग चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/हिंगोली/
Hingoli Farmers : कुणी किडनी घेतं का किडनी? कर्ज फेडण्यासाठी जगाच्या पोशिंद्याची दयनीय अवस्था!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल